🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला होता. कळवा येथील महानगरपालिका रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली होती.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपचारासाठी महाबळेश्वरला जाऊ शकतात. मात्र, ते महापालिका रुग्णालयामध्ये जाऊ शकत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Eknath Shinde may go to Mahabaleshwar to rest as his health deteriorates – Sanjay Raut
प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “ठाणे महानगरपालिका रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तब्येत बिघडली म्हणून आराम करण्यासाठी महाबळेश्वरला जाऊ शकतात. मात्र, ठाणे महापालिका रुग्णालयात जाऊ शकत नाही.
ठाण्यामध्ये साधारण 18 रुग्णांचा एका रात्रीत मृत्यू झाला आहे. त्यांचा आक्रोश कुणी ऐकायचा? एरवी मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टर घेऊन मदतीला धावण्याचं नाटक करतात.
परंतु, ज्या ठाण्याचं ते प्रतिनिधित्व करतात, त्या ठाण्यात एवढा मोठा आकांत आणि आक्रोश झाला असताना मुख्यमंत्री शिंदे त्या ठिकाणी पोहोचले नाही.
ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ही घटना जर इतर दुसऱ्या राज्यात घडली असती तर आत्तापर्यंत अमित शाह (Amit Shah) त्या ठिकाणी पोहोचले असते.”
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “सत्ताधाऱ्यांचे पोपटलाल मुंबई कोविड सेंटरचे खोटे घोटाळे काढत बसले आहे. मात्र, त्यांनी 18 लोकांच्या मृत्यूवर संवेदना देखील व्यक्त केली नाही.
कळव्याच्या रुग्णालयात घडलेला भ्रष्टाचार कोण करत आहे? याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला नाही. कारण मुंबई आणि ठाणे महानगरपालिकामध्ये लोकप्रतिनिधींचं राज्य नाही.
भारतीय जनता पक्षानं प्रशासन आपल्या हातात ठेवलं आहे. निवडणुका वेळेत घेऊन लोकप्रतिनिधींच्या हातात कारभार सांभाळायला दिला असता तर ठाण्यात घडलेला धक्कादायक प्रकार घडलाच नसता. सध्या महाराष्ट्राचा कारभार वेड्यांच्या हातात आहे. ही सगळी लोक सत्तेसाठी वेडी झालेली आहे.”
“आज भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या हट्टापायी मुंबई आणि ठाण्यासह 14 महानगरपालिकामध्ये लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळं त्या ठिकाणी अशा धक्कादायक घटना घडत आहे.
या सगळ्या गोष्टींमुळं लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागत आहे. या धक्कादायक घटना घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारपणाचं कारण देऊन महाबळेश्वरच्या पायथ्याशी आराम करत आहे”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Prithviraj Chavan | शरद पवारांना भाजपकडून मोठ्या ऑफर्स; पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक खुलासा
- Uddhav Thackeray | “…म्हणून शिंदेंची झोप उडाली”; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंना टोला
- Ajit Pawar | चांदणी चौक पुल लोकार्पणावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे…”
- Aditya Thackeray | “अहंकाराने फुगलेल्या खोके सरकारमधल्या…”; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर खोचक टीका
- Sanjay Shirsat | “मुख्यमंत्री शिंदेंना बळजबरीने ॲडमिट…”; संजय शिरसाटांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










