Prithviraj Chavan | शरद पवारांना भाजपकडून मोठ्या ऑफर्स; पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक खुलासा

Prithviraj Chavan | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल? याचा अंदाज लावणे कठीणच नाही तर अशक्य झाले आहे.

अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) देखील भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक विधान केलं आहे.

शरद पवारांना भाजपकडून मोठ्या ऑफर्स आल्या असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रांनं ही माहिती दिली आहे.

Ajit Pawar’s offer has been rejected by Sharad Pawar – Prithviraj Chavan

“शरद पवारांना भाजपने केंद्रीय कृषिमंत्री पद आणि नीती आयोगाच्या अध्यक्ष पदाची ऑफर दिली आहे. माझ्या माहितीनुसार, शरद पवार यांनी अजित पवारांनी दिलेली ऑफर नाकारली आहे.

पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांना ही ऑफर दिली होती. या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह जयंत पाटील देखील उपस्थित होते”, असं पृथ्वीराज (Prithviraj Chavan) चव्हाण यांनी म्हटलं असल्याचं फ्री प्रेस जर्नल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार काही आमदारांसह भाजप शिंदे सरकारमध्ये सामील झाले होते.

त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटी होत राहिल्या.

शनिवारी संध्याकाळी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर ही त्यांची तिसरी भेट होती. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.