Share

Sharad Pawar | महाविकास आघाडीत एकी आहे, संभ्रम निर्माण करू नका – शरद पवार

🕒 1 min read Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. मात्र, त्यानंतरही शरद पवार आणि अजित पवार यांच्या वारंवार भेटी होत राहिल्या. शनिवारी संध्याकाळी शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली होती. Related … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले.

मात्र, त्यानंतरही शरद पवार आणि अजित पवार यांच्या वारंवार भेटी होत राहिल्या. शनिवारी संध्याकाळी शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली होती.

त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

There is unity in Mahavikas Aghadi – Sharad Pawar 

अजित पवारांसोबत झालेल्या भेटीबद्दल बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “अजित पवार आणि माझ्यामध्ये झालेल्या भेटीचं कारण मी स्पष्टपणे सांगितलं आहे.

त्यामुळं याबाबत सतत प्रश्न विचारून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. महाविकास आघाडीमध्ये एकी आहे आणि ती कायम असणार. त्यामुळं कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करू नका. आमच्या बैठकीबाबत मी हीच भूमिका स्पष्ट केली आहे.”

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

“शरद पवारांना भाजपकडून दोन मोठ्या ऑफर्स आल्या आहे. यामध्ये भाजपने त्यांना केंद्रीय कृषिमंत्री पद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली आहे.

मात्र, शरद पवारांनी या ऑफर नाकारल्या असल्याचं मला कळालं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह या बैठकीला जयंत पाटील देखील उपस्थित होते”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं असल्याचं फ्री प्रेस जर्नल यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही