Share

Rohit Pawar | शिंदे गटातील आमदार ठाकरे गटात जाण्यास उत्सुक – रोहित पवार

Rohit Pawar | उस्मानाबाद: अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मंत्रीपद, पालकमंत्री पद, विकास निधी इत्यादी गोष्टींमुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. या कारणांवरून शिंदे गटातील काही आमदार ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार … Read more

Published On: 

Rohit Pawar | उस्मानाबाद: अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

मंत्रीपद, पालकमंत्री पद, विकास निधी इत्यादी गोष्टींमुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. या कारणांवरून शिंदे गटातील काही आमदार ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Most of the MLAs from the Shinde group are upset – Rohit Pawar

पत्रकारांशी संवाद साधत असताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “सध्या राज्यामध्ये जे सरकार आहे, ते सरकार पक्ष फोडून तयार झालेलं आहे.

त्यामुळं या सरकारला लोकांमधील नाराजी आणि लोकांचा विचार करायला वेळ नाही. सरकारमधील शिंदे गटातील बहुतांश आमदार नाराज आहे. शिंदे गटात सर्व काही ऑल वेल आहे, असं नाही.

सध्या राज्य सरकारमध्ये असलेले शिंदे गटातील 10 आणि इतर 05 असे 15 आमदार नाराज आहे. हे आमदार ठाकरे गटात जाण्यास इच्छुक आहे. त्यांना ठाकरे गटात घ्यायचं की नाही हा निर्णय तेच घेतील.”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि नावावर दावा ठोकला आहे.

याबाबत बोलत असताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडेच राहणार आहे, असा आम्हाला विश्वास आहे. आगामी काळात शरद पवार यांच्या विचारांचा विजय होईल.”

दरम्यान, स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे.

ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “नगरपरिषद आणि जिल्हा परिषद भरती संदर्भात परीक्षेचा फॉर्म भरताना MS-CIT प्रमाणपत्र अनिवार्य केले असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करता येत नाही.

राज्यसेवा तसेच इतर सरळसेवा भरतीमध्ये निवडीनंतर दोन वर्षाच्या कालावधीत MS-CIT प्रमाणपत्र द्यावे लागते, तीच अट नगरपरिषद आणि जिल्हा परिषद भरतीसाठी लागू केल्यास अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. तांत्रिक कारणांमुळे विद्यार्थी अर्ज करण्यास अपात्र होत असतील तर हा एक प्रकारचा अन्याय आहे.

आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अनेक विद्यार्थी आस लावून बसले आहेत. तरी आपण यासंदर्भात संबंधित विभागाला निर्देश द्यावेत ही विनंती.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही