Keshav Upadhye | “हा म्हणजे टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार…”; केशव उपाध्येंची संजय राऊतांवर खोचक टीका

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: कळवा येथील महानगरपालिका रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे काही रुग्णांचा  मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती.

मुख्यमंत्री शिंदे उपचार आणि आराम करण्यासाठी महाबळेश्वरला जाऊ शकतात. मात्र, ते कळवा रुग्णालयात जाऊ शकत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्याला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विट करत केशव उपाध्ये म्हणाले, “ठाण्यातील घटना अतिशय दुःखद आहे. पण, त्यातही राजकारण करण्याची वृत्ती निषेधार्हच आहे.

आजारी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व चौकशी सुरू झाली हे पहाण्याऐवजी टीका करणे म्हणजे टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे.”

Eknath Shinde may go to Mahabaleshwar to rest as his health deteriorates – Sanjay Raut

दरम्यान, आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “कळवा येथील रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे.

ही घटना घडलेली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःची तब्येत बिघडली म्हणून आराम करण्यासाठी महाबळेश्वरला जाऊ शकतात. मात्र, चौकशी करण्यासाठी ते या रुग्णालयाला भेट देऊ शकत नाही.

या रुग्णालयामध्ये साधारण 18 रुग्णांचा एका रात्रीत मृत्यू झाला आहे. त्यांचा आक्रोश आणि आकांत कुणी ऐकायचा? एरवी मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टर घेऊन मदतीला धावण्याचं नाटक करतात. परंतु मुख्यमंत्री शिंदे या घटनास्थळी पोहोचलेले नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.