Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर हे शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बैठकी सुरूच आहे.
शनिवारी संध्याकाळी शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त बैठक झाली होती. त्यांच्या या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांना भेटायची जागा ‘चोर’डिया नावाच्या व्यक्तीकडे मिळाली. ही देखील कमालच आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
They are all together – Raj Thackeray
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल बोलत असताना राज ठाकरे म्हणाले, “मी तुम्हाला आधी देखील सांगितलं होतं की शरद पवारांनी त्यांची एक टीम पाठवली आहे. आता त्यांची दुसरी टीम देखील लवकरच सत्ताधाऱ्यांमध्ये सामील होईल.
हे सगळे एकमेकांच्या सोबत आहे. हे आज-काल नाही तर आधीपासूनच घडत आहे. पहाटेचा शपथविधी तुम्ही विसरलात का? तेव्हापासूनच हे सर्व सुरू आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा देखील ‘चोर’डिया नावाच्या व्यक्तीकडे मिळाली आहे. ही एक मोठी गंमतच आहे.
दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. प्रेस फ्री जर्नल या इंग्रजी वृत्तपत्राने याबद्दल माहिती दिली आहे.
त्यांच्या वृत्तानुसार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “भाजपने शरद पवारांना दोन मोठ्या ऑफर्स दिल्या आहे. भाजपने शरद पवारांना केंद्रीय कृषिमंत्री पद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली आहे. मात्र, पवारांनी भाजपची ही ऑफर नाकारली असल्याची माहिती मिळाली आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat | रोहित पवार उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते झाले – संजय शिरसाट
- Keshav Upadhye | “हा म्हणजे टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार…”; केशव उपाध्येंची संजय राऊतांवर खोचक टीका
- Sharad Pawar | मला भाजपसोबत जाण्यास स्वारस्य वाटत नाही – शरद पवार
- Rohit Pawar | शिंदे गटातील आमदार ठाकरे गटात जाण्यास उत्सुक – रोहित पवार
- Rohit Pawar | “मुख्यमंत्री साहेब अनेक विद्यार्थी आस लावून…”; विद्यार्थ्यांच्या समस्येवर रोहित पवारांची CM शिंदेंना विनंती