Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे.
अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे गटातील आमदारांवर खोचक टीका केली होती. शिंदे गटातील आमदार ठाकरे गटात जाण्यास उत्सुक असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.
रोहित पवार यांच्या या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Raut is the spokesperson of the Thackeray group – Sanjay Shirsat
रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “रोहित पवारांनी आपल्या पक्षात काय चाललंय ते बघावं. दुसऱ्यांच्या पक्षात काय चाललंय? यात त्यांनी लक्ष घालू नये.
रोहित पवार उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते झाले आहे. या गोष्टीचं मला खूप जास्त आश्चर्य वाटत आहे. कारण संजय राऊत हे ठाकरे गटाचे प्रवक्ते आहे.
त्यामुळं रोहित पवार कशाला आता त्यांचे प्रवक्ते होत आहे. रोहित पवारांनी स्वतःच्या पक्षात काय सुरू आहे, त्याच्याकडं लक्ष द्यायला हवं.”
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली होती. ते म्हणाले, “सध्या राज्यामध्ये असणारं सरकार पक्ष फोडून तयार झालेलं आहे.
त्यामुळं या सरकारला लोकांच्या नाराजीचा विचार करायला वेळ नाही. सरकारमधील शिंदे गटातील आमदार नाराज आहे. शिंदे गटातील 10 आणि इतर 05 असे 15 आमदार सध्या नाराज आहे.
हे आमदार ठाकरे गटात जाण्यास इच्छुक आहे. त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं का नाही? हे उद्धव ठाकरे यांनी ठरवावं.”
महत्वाच्या बातम्या
- Keshav Upadhye | “हा म्हणजे टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार…”; केशव उपाध्येंची संजय राऊतांवर खोचक टीका
- Sharad Pawar | मला भाजपसोबत जाण्यास स्वारस्य वाटत नाही – शरद पवार
- Rohit Pawar | शिंदे गटातील आमदार ठाकरे गटात जाण्यास उत्सुक – रोहित पवार
- Rohit Pawar | “मुख्यमंत्री साहेब अनेक विद्यार्थी आस लावून…”; विद्यार्थ्यांच्या समस्येवर रोहित पवारांची CM शिंदेंना विनंती
- Sharad Pawar | महाविकास आघाडीत एकी आहे, संभ्रम निर्माण करू नका – शरद पवार