Raj Thackeray | पनवेल: पनवेलमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.
या मेळाव्यामध्ये बोलत असताना राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर बोचरी टीका केली आहे. भाजपने दुसऱ्याचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला शिकलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “भारतीय जनता पक्षाने दुसऱ्याचे आमदार न फोडत आपला पक्ष उभा करायला शिकायला हवं. लोकांच्या कनपट्टीवर बंदूक ठेवायची आणि त्यांना आत आणायचं.
महाराष्ट्रामध्ये सध्या निर्लज्जपणाचा कळस सुरू आहे. या लोकांना धडा शिकवावा आणि घरी बसवावं. ही लोक निवडणुका तोंडावर आल्या की घोषणाबाजी करतात. मात्र, सत्तेत आल्यावर फक्त करू-करू म्हणतात.”
Samriddhi Highway has not been fenced till now – Raj Thackeray
यावेळी बोलत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रस्त्यांच्या वाईट परिस्थितीवरून भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, “समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंत फेन्सिंग घातलेली नाही. रस्त्यावर जनावरे येत असतात, त्यावेळी चालकांनी काय करायचं?
समृद्धी महामार्ग 400 दिवसांपासून लोकांसाठी खुला करून दिला आहे. मात्र त्या रस्त्यावर आतापर्यंत साडेतीनशे लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
समृद्धी महामार्गावर सरकारने व्यवस्थित काम केलं नाही. परंतु त्या ठिकाणी सरकारने टोल उभा केला आहे. याचा अर्थ असा की टोल भरायचा आणि मरायचं.”
“समृद्धी महामार्गासह गोवा मुंबई महामार्गावर देखील अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेकांच्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
मात्र, तरीही जनता त्याच लोकांना पुन्हा पुन्हा निवडून देत आहे. मुंबई गोवा महामार्गावर आत्तापर्यंत 15666 कोटी रुपये खर्च झाला आहे. मात्र, तरीही हा रस्ता चांगला झालेला नाही”, असही ते (Raj Thackeray) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | नवाब मलिक कोणत्या गटात जातील? सुप्रिया सुळे यांनी स्पष्टचं सांगितलं
- Sushma Andhare | “हनुमान चालीसा म्हटल्यानं प्रश्न सुटले असते तर…”; सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर खोचक टीका
- Eknath Shinde | “अनेक दिवसांपासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न…”; CM शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
- Sanjay Raut | महाविकास आघाडीत फूट पडणार? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं
- Sharad Ponkshe | “राहुल गांधी मूळचे खान…”; शरद पोक्षे यांचं खळबळजन विधान