Supriya Sule | नवाब मलिक कोणत्या गटात जातील? सुप्रिया सुळे यांनी स्पष्टचं सांगितलं

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) जेलमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून ते मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे जेलमध्ये होते. वैद्यकीय कारणामुळे त्यांना दोन महिन्यासाठी जामीन देण्यात आला आहे.

त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या गटात जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nawab Malik is like an elder brother to me – Supriya Sule

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी नवाब मलिक यांच्यावर भाष्य केलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “नवाब मलिक मला मोठ्या भावासारखे आहे. नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर ते शरद पवार गटात जातील की अजित पवार (Ajit Pawar) गटात जातील हे मला माहीत नाही.

मात्र, नवाब मलिक जो काही निर्णय घेतील तो त्यांचा निर्णय असेल. राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जायचं? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्यावर कोणी अन्याय केला? हे सगळ्यांना माहित आहे. मात्र, राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी कुटुंब एकच आहे.”

दरम्यान, नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठं वक्तव्य केलं होतं.

ते म्हणाले, “शरद पवारांनी (Sharad Pawar) नवाब मलिक यांना अनेक चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या आहे. त्यांच्यावर पवार साहेबांचे खूप उपकार आहे. शरद पवारांनी त्यांना मंत्री केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी देखील पक्षासाठी खूप मेहनत घेतली आहे.

त्यामुळे नवाब मलिक शरद पवारांना पाठिंबा देतील, असं मला वाटतं. मात्र, भारतीय जनता पक्ष देखील नवाब मलिक यांना ऑफर देऊ शकते.

कारण भाजपकडे सध्या एक मशीन आहे. त्या मशीनमध्ये कुणालाही टाकलं तर ती व्यक्ती स्वच्छ होऊन बाहेर पडते आणि नंतर मंत्री होते.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.