एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदमांनीच घेतलीये का? ऑडिओ क्लिपवरून प्रसाद लाड यांचा पलटवार

मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून महायुतीत वाद उफाळला असून, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

Published On: 

BJP MLA Prasad Lad hitting back at Shivsena leader Ramdas Kadam

मुंबई, 23 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून ५०० कोटींच्या आरोपांचा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर रोख ठेवल्यानंतर महायुतीतच वादाची ठिणगी पडली आहे. या ऑडिओ क्लिपवरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधल्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी त्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. ‘एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली आहे की काय?’ असा थेट सवाल लाड (Prasad Lad) यांनी उपस्थित केला आहे.

रामदास कदम यांनी जरांगे पाटील व प्रसाद लाड यांच्यात जवळीक असल्याचा दावा करत, त्यांच्या भेटीचे आणि एकत्र जेवतानाचे फोटो दाखवले होते. तसेच, ही ऑडिओ क्लिप एआय नसून भाजपचीच असल्याचे कदम म्हणाले होते. याला प्रत्युत्तर देताना लाड यांनी सुनावले की, कदम ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी संजय राऊतांसारखे कृत्य करू नये. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम त्यांनी करू नये. तसेच, अशी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती, असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे हे केवळ शिवसेनेचे नव्हे, तर संपूर्ण महायुतीचे नेते असल्याचे लाड यांनी स्पष्ट केले. जरांगे पाटील यांनी केलेले आरोप फेटाळून लावताना लाड म्हणाले की, आपण सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाचे काम करत होतो आणि जरांगे यांच्याशी चर्चा करणाऱ्यांमध्ये केवळ आपणच नाही, तर त्यांचे नेते उदय सामंत हेदेखील सतत संपर्कात होते. जरांगे यांनी माझा उल्लेख करून मी आता कुठे गेलो व भेटत नसल्याचे म्हटले आहे, मात्र त्यांना रोज भेटण्याचे आपले काम नाही, असे लाड यांनी स्पष्ट केले.

या वादात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही उडी घेत रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपसोबत राहायचे आणि शिव्याही द्यायच्या, हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दरेकर यांनी दिला. कदम यांनी प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, परंतु काळकुटे यांचे अनेक होर्डिंग्ज शिंदेंसोबत दिसत असल्याचे दरेकर म्हणाले. रामदासभाईंनी सुपाऱ्यांबद्दल बोलावे कारण तसा त्यांचा इतिहास आहे. आम्ही लेचेपेचे नाही, असे खालच्या पातळीवरील आरोप केल्यास आम्ही गप्प बसणार नाही आणि याचा महायुतीवरही परिणाम होऊ शकतो, असे दरेकर यांनी ठणकावून सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

आमदार प्रसाद लाड यांनी 'एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली आहे की काय?' असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही