मनोज जरांगेंचे आंदोलन संपवण्यासाठी भाजपने ५०० कोटी दिले, पण ते गायब झाले; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

मनोज जरांगे यांचे आंदोलन संपवण्यासाठी भाजपने ५०० कोटी दिले, पण ते गायब झाले. यावर ईडी, सीबीआय गप्प का? असा सवाल संजय राऊतांनी केला.

Published On: 

Sanjay Raut criiticized amit shah over waqf amendment bill

प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपवण्यासाठी आणि ते विकत घेण्यासाठी भाजपच्या लोकांनी ५०० कोटी रुपये दिले होते. मात्र, ही ५०० कोटींची भलीमोठी रक्कम मधल्यामध्येच गायब झाली आहे. या गायब झालेल्या पैशांवर अमित शाह यांची ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि आर्थिक गुन्हे शाखा (EOW) गप्प का आहे? असा खळबळजनक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, भाजपच्या चौकशीवर कोण विश्वास ठेवणार? त्यामुळे अमित शाह यांनीच या ५०० कोटींची चौकशी करावी, असे आव्हानही राऊत यांनी दिले.

अमित शाह यांनी ‘कितीही आंदोलने केली तरी सत्ता बदलणार नाही’ असे विधान करत आज आव्हान दिले होते. यावरून राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार प्रहार केला. “तुम्हाला असे कोणी सांगितले? तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आला आहात का? मिस्टर लॉरेन शाह, अमित बिश्नोई, तुम्ही अमरपट्टा आणलेला नाही, तुम्हाला सत्तेतून जावेच लागेल,” असे राऊत म्हणाले. सत्ता जाण्याच्या भीतीने शाह यांचे पाय लटपटत असून त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत असल्याचा घणाघातही त्यांनी (Sanjay Raut) केला.

याशिवाय, बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी अमित शाह यांना लक्ष्य केले. देशात कोट्यवधी बांगलादेशी असल्याचे तुम्हीच सांगता, मग गेल्या १२ वर्षांत तुम्ही किती जणांना देशाबाहेर काढले? अशी विचारणा त्यांनी केली. जर तुम्ही बांगलादेशींना देशाबाहेर काढू शकत नसाल, तर तुम्ही ‘यु आर फेलर होम मिनिस्टर’ आहात आणि तुम्हाला या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी हल्लाबोल केला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपवण्यासाठी आणि ते विकत घेण्यासाठी भाजपच्या लोकांनी ५०० कोटी रुपये दिले होते, परंतु ही रक्कम मधल्यामध्येच गायब झाली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही