Raj Thackeray | पनवेल: आज (16 ऑगस्ट) पनवेलमध्ये मनसेने निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यामध्ये बोलत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) खोचक टीका केली आहे.
अजित पवार जेलमध्ये जाण्याच्या भीतीनं राज्य सरकारमध्ये सामील झाले असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मनसेच्या निर्धार मेळाव्यामध्ये बोलत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “आम्ही सरकारमध्ये राज्याचा विकास करण्यासाठी सामील झालो असं राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते सांगतात. मात्र, ती लोकं खोटं बोलतात.
कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर केला होता. त्यानंतर लगेच सगळे सत्तेत सामील झाले.
कारण छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यांना त्यांचा जेलमधील अनुभव सांगितला असेल. जेलमध्ये काय-काय करावं लागतं आणि जेलमध्ये काय काय असतं?
याबद्दल भुजबळ यांनी त्यांना माहिती दिली असेल. म्हणून ते जेलमध्ये जाण्याऐवजी सत्तेत सहभागी झाले असतील.”
BJP should learn to build its own party without breaking others’ party – Raj Thackeray
यावेळी बोलत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भारतीय जनता पक्षावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रमध्ये सध्या निर्लज्जपणाचा कळस सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाने दुसऱ्याचे पक्ष न फोडता आपला पक्ष उभा करायला शिकायला पाहिजे. लोकांच्या कनपट्टीवर बंदूक ठेवायची आणि त्यांना पक्षात आणायचं.
या लोकांना आता धडा शिकवून घरी बसवायला हवं. निवडणुका तोंडावर आल्या की ही लोकं विकासाच्या घोषणा देतात. मात्र, सत्तेत आल्यावर विकास काम होत नाही. तरीही जनता वारंवार त्यांनाच निवडून देत आहे.”
“समृद्धी महामार्ग आणि गोवा मुंबई महामार्गावर अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. समृद्धी महामार्ग लोकांसाठी खुला करून 400 दिवस झाले आहे.
परंतु त्या रस्त्यावर आतापर्यंत साडेतीनशे लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं आहे. या महामार्गाचं सरकारनं व्यवस्थित काम केलेलं नाही. मात्र या रस्त्यावर सरकारनं टोल उभा केला आहे. म्हणजे या महामार्गावरून जात असताना टोल भरायचा आणि मरायचं”, असही ते (Raj Thackeray) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat | “विजय वडेट्टीवार मोदींसोबत नाश्ता करायला…”; संजय शिरसाटांनी वडेट्टीवारांचे कान टोचले
- Raj Thackeray | “भाजपने इतरांचे आमदार न फोडता आपला पक्ष…”; राज ठाकरेंची भाजपवर बोचरी टीका
- Supriya Sule | नवाब मलिक कोणत्या गटात जातील? सुप्रिया सुळे यांनी स्पष्टचं सांगितलं
- Sushma Andhare | “हनुमान चालीसा म्हटल्यानं प्रश्न सुटले असते तर…”; सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर खोचक टीका
- Eknath Shinde | “अनेक दिवसांपासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न…”; CM शिंदेंचा विरोधकांवर निशाणा