Nawab Malik | नवाब मलिकांचं ठरलं! शरद पवारांना देणार पाठिंबा

Nawab Malik | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक जेलमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली होती. नवाब मलिक गेल्या अनेक महिन्यांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे जेलमध्ये होते.

वैद्यकीय कारणामुळे त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन देण्यात आला आहे. त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला पाठिंबा दर्शवणार? बाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना नवाब मलिक यांनी पूर्णविराम दिला असल्याचं बोललं जात आहे.

We will stay with the original NCP – Nawab Malik

नवाब मलिक (Nawab Malik) राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाला पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलं आहे. आपण मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहणार असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं असल्याचं एका इंग्रजी दैनिकानं नवाब मलिक यांच्या हवाल्यातून वृत्त दिलं आहे.

“गेल्या 18 महिन्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून मी किडनीच्या आजारामुळे त्रस्त आहे.

मी माझ्या प्रकृतीची काळजी घेण्यास प्रथम प्राधान्य देणार आहे. तब्येतीची व्यवस्थित काळजी घेतल्यानं महिनाभरात मी ठीक होऊ शकतो.

यासाठी मी मुंबईतील चांगल्या डॉक्टरकडून उपचार घेईल”, असं नवाब मलिक यांनी म्हटलं असल्याचं या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती.

त्या म्हणाल्या, “नवाब मलिक मला मोठ्या भावासारखे आहे. राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा, हा पूर्णपणे त्यांचा निर्णय असेल. शरद पवार की अजित पवार कोणाला पाठिंबा द्यायचा? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.

नवाब मलिक यांच्यावर कोणी अन्याय केला? हे सर्वांनाच माहित आहे. मात्र, आमच्या राजकीय भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी आमचं कुटुंब एकच आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.