Ajit Pawar | अजित पवार ॲक्शन मोडमध्ये; पुणे शहरात मोर्चेबांधणीला सुरुवात

Ajit Pawar | पुणे: 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले होते.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. यानंतर अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) दोन्ही गटांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरे करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर शरद पवारांच्या जागोजागी जाहीर सभा होत आहे.

तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पुण्यामध्ये एक कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाला दिलीप वळसे पाटील, रूपाली चाकणकर, सुनील तटकरे आदी नेते उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमामध्ये पक्षातील कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटापेक्षा आपला गट मजबूत व्हावा, यासाठी अजित पवार (Ajit Pawar) प्रयत्न करताना दिसत आहे. पुणे शहर दोन्ही नेत्यांचा बालेकिल्ला आहे.

त्यामुळं पुण्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार दोन्हीही गट जोरदार तयारी करताना दिसत आहे.

Sharad Pawar held a public meeting in Beed yesterday

दरम्यान, काल (17 ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. त्यांच्या या सभेला उदंड प्रतिसाद मिळालेला दिसला आहे. त्याचबरोबर या सभेमध्ये बोलत असताना शरद पवार यांनी विरोधकांना चांगलं सुनावलं आहे.

त्यामुळं शरद पवार यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्यापेक्षा भव्य सभा आयोजित करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार यांना वेळ मिळाल्यास 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असल्याचं बोललं जात आहे

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.