Sanjay Raut | मुंबई: पुढच्या वर्षी देशामध्ये लोकसभा तर राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहे. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Mahavikas Aghadi is very strong – Sanjay Raut
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं नेमकं काय सूत्र ठरलं आहे? याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे. अशात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या संदर्भात सूचक विधान केलं आहे.
ते म्हणाले, “राज्यामध्ये महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस तिन्ही पक्ष एकत्र मिळून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढणार आहे.
मविआमध्ये तीन पक्ष एकत्र असल्यामुळे आम्हाला जागवाटपामध्ये थोड्याशा तडजोडी कराव्या लागतील. या तडजोडी करण्यासाठी आमची पूर्णपणे तयारी आहे.
त्याचबरोबर आमच्या कार्यकर्त्यांनी यासाठी मानसिकता बनवून ठेवली आहे. जागेचा हट्ट करायचा नाही, जिंकेल त्याची जागा असं आमचं ठरलं आहे.”
कॅगने मोदी सरकारचे सात घोटाळे समोर आणले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “कॅगने मोदी सरकारचे घोटाळे समोर आणले आहे.
तर त्यांनी आता कॅगवर ईडी चौकशी केली पाहिजे. कॅगने केंद्र सरकारचे मोठे घोटाळे समोर आणले आहे. कॅगने सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही भ्रष्टाचारी ठरवा.”
विरोधकांच्या इंडिया आघाडीची लवकरच मुंबईमध्ये बैठक होणार आहे. याबाबत देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे.
ते म्हणाले, “भारत जितेगा हे आमच्या इंडिया आघाडीचे घोषवाक्य आहे. याआधी पाटणा आणि बंगळूर शहरामध्ये इंडियाची बैठक पार पडली आहे.
या शहरामध्ये इंडियाची सत्ता आहे. मात्र, राज्यामध्ये इंडियाची सत्ता नाही, तरीही आम्ही या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं आहे. सत्तेशिवाय आम्ही राज्यात इंडियाची बैठक घेत आहोत.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “… म्हणून सरकारने सिनेट निवडणुका रद्द केल्या”; संजय राऊतांचं मोठं विधान
- Nawab Malik | नवाब मलिकांचं ठरलं! शरद पवारांना देणार पाठिंबा
- Ajit Pawar | अजित पवार ॲक्शन मोडमध्ये; पुणे शहरात मोर्चेबांधणीला सुरुवात
- Kirit Somaiya – शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी अडचणीत? गवळी यांच्यावर आरोप करणाऱ्या CA च्या घरी किरीट सोमय्या
- Sharad Pawar | भाजप आणि मोदींविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न – शरद पवार