Sanjay Raut | मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाचा सिनेट निवडणूक (Senate election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारनं मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकांचा कार्यक्रम अचानक रद्द केला आहे.
रातोरात हा कार्यक्रम रद्द झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “राज्य सरकारच्या मनामध्ये हरण्याची भीती आहे, म्हणून त्यांनी या निवडणुका रद्द केल्या. मात्र, त्यांच्या मनात ही भीती असणं, चांगलं आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईसारख्या शहराला महापौर नाही. त्याचबरोबर पुणे, ठाणे, नागपूर या मोठ्या शहरांना देखील महापौर नाही. पराभवाच्या भीतीनं राज्य सरकार या निवडणुका घेत नाही.
लोकसभा निवडणूका तुम्ही हरणार आहात, मग तुम्ही त्या निवडणुका देखील घेणार नाही का? सिनेट निवडणुकांसाठी आम्ही पूर्णपणे तयार होतो. आम्ही या निवडणुका जिंकू म्हणून राज्य सरकारनं निवडणुका रद्द केल्या आहे.”
The state government is not ready to hold any elections – Sanjay Raut
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “राज्य सरकारनं या निवडणुका रद्द केल्या आहे. मात्र, यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कारण राज्य सरकार सध्या कोणत्याच निवडणुका घ्यायला तयार नाही.
परंतु, सरकार किती निवडणुका रद्द करेल? उद्या भीतीपोटी तुम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका देखील घेणार नाही का? राज्य सरकार त्यांच्या हरण्याच्या भीतीपोटी लोकशाहीचा गळा घोटत आहे.
आता राज्य सरकारकडं सिनेटची निवडणूक रद्द करण्यासाठी कोणतंही कारण नव्हतं. मात्र, तरीही या निवडणुका रद्द करण्यात आल्या.”
यावेळी बोलत असताना त्यांनी (Sanjay Raut) महाविकास आघाडीच्या मजबुतीवर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी अत्यंत मजबूत आहे.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र लढणार आहोत. तीन पक्ष एकत्रित असल्यामुळं जागा वाटपामध्ये आम्हाला अनेक तडजोडी कराव्या लागतील.
हे सर्व करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आमचे कार्यकर्ते यासाठी तयार आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी ठरवलं आहे की जागा वाटपावरून आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद होऊ द्यायचे नाही. जिंकेल त्याची जागा असं आमचं ठरलं आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Nawab Malik | नवाब मलिकांचं ठरलं! शरद पवारांना देणार पाठिंबा
- Ajit Pawar | अजित पवार ॲक्शन मोडमध्ये; पुणे शहरात मोर्चेबांधणीला सुरुवात
- Kirit Somaiya – शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी अडचणीत? गवळी यांच्यावर आरोप करणाऱ्या CA च्या घरी किरीट सोमय्या
- Sharad Pawar | भाजप आणि मोदींविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न – शरद पवार
- Narendra Modi | कॅगचा मोठा खुलासा! मोदी सरकारचे 7 घोटाळे केले उघड