🕒 1 min read
Narendra Modi | नवी दिल्ली: देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढताना दिसत आहे. या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर वारंवार टीका करत असतात.
अशात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. महागाई थांबवण्यासाठी मंत्रालयांच्या बजेटमधून कपात केली जाणार असल्याचं बोललं जात आहे.
भारतीय अधिकारी विविध मंत्रालयांच्या बजेटमधून एक लाख रुपये कमी करण्याचा विचार करत आहे. हा पैसा इंधन आणि अन्नाच्या किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी वापरला जाईल, असं तज्ञांनी म्हटलं आहे.
Imports of wheat and cooking oil may become cheaper
देशातील महागाई थांबवण्यासाठी मोदी (Narendra Modi) सरकार येत्या काही दिवसांमध्ये या पार्श्वभूमीवर निर्णय घेईल. हा निर्णय झाल्यानंतर पेट्रोल दर कमी होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर यानंतर गव्हाची आयत आणि स्वयंपाकाचं तेल देखील स्वस्त होऊ शकतं. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी देखील अशीच योजना आणली होती.
सरकारनं 26 बिलियन डॉलरची योजना आणली होती. किमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं ही योजना आणली होती.
दरम्यान, देशातील महागाई कमी करण्यासाठी सरकारच्या हालचाली वाढल्या असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये सांगितलं होतं.
त्यानंतर केंद्र सरकार महागाई कमी करण्यासाठी मंत्रालयाच्या बजेटमधून एक लाख रुपये कमी करण्याचा विचार करत आहे. त्याचबरोबर साठेबाजी करणाऱ्यांविरुद्धची कारवाई आणखीन तीव्र करण्यात येणार आहे, त्यामुळं दरामध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे, असं देखील तज्ञांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Bacchu Kadu | “छातीवर तलवार ठेवली तरी मंत्रिपद…”; बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी
- Jitendra Awhad | “अरे पळकुट्या, नाव तर…”; जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला
- Sanjay Raut | मविआचं जागा वाटप सूत्र ठरलं? संजय राऊतांचा मोठा खुलासा
- Sanjay Raut | “… म्हणून सरकारने सिनेट निवडणुका रद्द केल्या”; संजय राऊतांचं मोठं विधान
- Nawab Malik | नवाब मलिकांचं ठरलं! शरद पवारांना देणार पाठिंबा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










