Aditya Thackeray | ये डर अच्छा है; सिनेट निवडणुकांवरून आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारनं मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूका अचानक रद्द केल्या आहे. रातोरात या निवडणुका रद्द करण्यात आल्यामुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

तर या मुद्द्यावरून ठाकरे गटानं राज्य सरकारला चांगलं धारेवर धरलं आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. भीतीपोटी मिंधे-भाजप सरकारनं या निवडणुका रद्द केल्या असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Yeh Dar Achcha Hai – Aditya Thackeray

ट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले, “मिंधे-भाजप सरकारनं त्यांच्या बेकायदेशीर आणि भ्रष्ट राजवटीसाठी जनतेचा जनादेश गमावला आहे. मात्र, ये डर अच्छा है.

परंतु लोकशाही रद्द करणं हे आपल्या देशासाठी चांगलं नाही. देशभक्त म्हणून आम्ही या राजवटीचा सामना करणार आहोत. मिंधे-भाजप सरकार निवडणूकांना एवढं घाबरलेलं आहे की त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका रद्द केल्या.”

दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले, “राज्य सरकारने अचानक या निवडणुका रद्द केल्या आहे.

मात्र, यामध्ये कोणत्याही प्रकारचं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कारण सध्याचं सरकार कोणत्याच निवडणुका घ्यायला तयार नाही. परंतु सरकार किती निवडणुका रद्द करेल?

उद्या भीतीपोटी ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुका देखील रद्द करतील का? सरकारनं भीतीपोटी सिनेट निवडणुका रद्द केल्या आहे.

या निवडणुकांसाठी आमची पूर्ण तयारी झालेली होती. आम्ही या निवडणुका जिंकू म्हणून राज्य सरकारनं या निवडणुका रद्द केल्या आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.