Share

Raj Thackeray | खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक; म्हणाले, “तोडफोड करून…”

Raj Thackeray | पुणे: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. आज ते पुण्यातील हडपसरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना रस्त्याच्या खड्ड्यांवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आमची मुलं रस्त्यावर उतरली आहे. तर … Read more

Published On: 

Raj Thackeray | पुणे: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे.

आज ते पुण्यातील हडपसरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना रस्त्याच्या खड्ड्यांवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आमची मुलं रस्त्यावर उतरली आहे. तर काही ठिकाणी तोडफोडही सुरू झाली आहे. मात्र, दरवेळी तोडफोड करून काही होत नाही.

कारण रस्त्यावरून अनेक लोक, गरोदर स्त्रिया जात असतात. त्यामुळं नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “रस्त्यावरील खड्ड्याच्या मुद्द्यावरून आमची मुलं रस्त्यावर उतरली आहे. या प्रकरणावरून त्यांचं अनेक ठिकाणी आक्रमक आंदोलन सुरू आहे.

त्यांच्या या आंदोलनाला मी काहीच करू शकत नाही. रस्त्यावर खड्डे हे पहिल्यांदा पडलेले नाही. गेल्या अनेक वर्षापासून लोक या समस्येचा सामना करत आहे.

मात्र, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की जे लोकप्रतिनिधी लोकांच्या या समस्या सोडवू शकत नाही, लोक त्यांनाच निवडून देतात.”

पुढे बोलताना ते (Raj Thackeray) म्हणाले, “धर्म जात आणि इतर कोणत्याही विषयावरचे प्रश्न कधी सुटत नाही. लोकांचा राग जोपर्यंत मतपेटीतून उतरणार नाही तोपर्यंत रस्त्यावरचे खड्डे बुजणार नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकदा या मुद्द्यांवरून आंदोलनं केली आहे. मात्र, त्यातून काहीही मिळालेलं नाही. जे आपल्या राज्याचं नुकसान करतात त्यांनाच जनता निवडून देते.”

Our agitation has started on the Mumbai-Goa highway – Raj Thackeray

“मनसेनं आत्तापर्यंत 16 ठिकाणी आंदोनं केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आमचं आंदोलन सुरू झालं आहे. त्याचबरोबर येत्या काळात मुंबई-नाशिक हायवेवर देखील आंदोलन होण्याची शक्यता आहे.

या आंदोलनानंतर तरी सरकार जागं होईल, अशी आमची अपेक्षा आहे. राज्यामध्ये कायदा नावाची गोष्ट राहिलेली नाही. निवडणुका कधी होईल? याबाबत कुणाला माहित नाही. त्याचबरोबर या मुद्द्यावरून राज्य सरकारला कोणी प्रश्न विचारत नाही”, असही ते (Raj Thackeray) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही