Bacchu Kadu | अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सरकारचं वाटोळं होईल – बच्चू कडू

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या महिन्यामध्ये राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले होते.

त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. अशा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

No one should come in the way of Eknath Shinde – Bacchu Kadu

शरद पवार (Sharad Pawar) भाजपसोबत आले तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं असल्याचं विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटलं होतं.

यावर भाष्य करत असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “शरद पवार आमच्यासोबत आले तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात.

मात्र, खरच जर असं झालं तर सरकारचं वाटोळ होईल. म्हणून एकनाथ शिंदे यांच्या वाटेत कुणी आडवं येऊ नये.”

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील सर्व मंत्र्यांना वांद्रा येथील ताज लॉर्ड्स एंड हॉटेलमध्ये डिनरसाठी सहकुटुंब बोलवलं आहे.

मात्र, या कार्यक्रमाचं मुख्यमंत्री शिंदे यांनी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना निमंत्रण दिलेलं नाही. यावरून बच्चू कडू यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, “कदाचित मी कॅबिनेट मंत्री नसल्यामुळं मला या कार्यक्रमाला बोलावलं नसेल. कारण मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण फक्त कॅबिनेट मंत्र्यांना दिलं आहे.

मंत्री असणं आणि मंत्री पदाचा दर्जा असणं यामध्ये खूप फरक आहे. आता मला मंत्रीपदाची ऑफर आली तरी मी ती स्वीकारणार नाही. माझ्या छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्री होणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.