Share

Supriya Sule | राजकारणात मी कशासाठी आले? सुप्रिया सुळेंनी स्पष्ट सांगितलं

Supriya Sule | बारामती: राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. माझं राजकारण हे माझं समाजकारण आहे. लोकांची सेवा करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी राजकारणात आले आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. NCP is not the Pawar family … Read more

Published On: 

Supriya Sule | बारामती: राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.

माझं राजकारण हे माझं समाजकारण आहे. लोकांची सेवा करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी राजकारणात आले आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

NCP is not the Pawar family – Supriya Sule

पत्रकारांसोबत संवाद साधत असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “बारामती हे माझं माहेर आणि कर्मभूमी आहे. त्याचबरोबर इथली लोक कायम माझ्यासोबत आहेत.

या शहरातील कार्यकर्ते पवार कुटुंबाचा खूप महत्त्वाचा भाग आहे.त्यामुळे या ठिकाणचे कार्यकर्ते कुठल्याही गटात असले तरी त्याचा तुम्ही वेगळा आणि चुकीचा अर्थ काढू नये.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या नेत्यांच्या विचारांमध्ये अंतर आलं आहे. मात्र, त्याचा पवार कुटुंबाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार कुटुंब नाही.”

पुढे बोलताना त्या (Supriya Sule) म्हणाल्या, “आम्ही सर्व जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणामध्ये आलो आहोत. माझं राजकारण हे माझं समाजकारण आहे. मी राजकारणामध्ये फक्त तीन कामांसाठी आले आहे.

सेवा, शेतकऱ्यांचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी राजकारणात काम करत आहे. बारामतीच्या लोकांनी हे काम करण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून मला संधी दिली आहे.

त्यासाठी मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहील. आपला बारामती लोकसभा मतदारसंघ कायम पहिल्या क्रमांकावर राहावा, यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असते.”

“दीड वर्ष उलटून गेले तरी निवडणुकांचा पत्ता नाही. सर्व सामान्य जनतेने आपले प्रश्न कुणासमोर मांडावे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुका होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, निवडणुका लवकर होतील असं वाटत नाही”, असही त्या (Supriya Sule) यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही