Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या वारंवार भेटी होताना दिसत आहे.
त्यांच्या या भेटीनंतर शरद पवार भाजप सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्याचबरोबर त्यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या दिसल्या होत्या.
अशात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार एक दिवस नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं नेतृत्व मान्य करतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
India is progressing day by day under the leadership of Narendra Modi – Chandrashekhar Bawankule
माध्यमांशी बातचीत करत असताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
एका कुटुंबातील दोन लोकं भेटले तर त्यांचं राजकारण करू नये. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिवसेंदिवस भारताची प्रगती होत आहे. नरेंद्र मोदी 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला स्वयंपूर्ण बनवू शकतात.
ही भावना एक दिवस शरद पवार यांच्या मनात नक्की येईल. एक दिवस कधी ना कधी शरद पवार नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि त्यांची क्षमता नक्की मान्य करतील.”
शरद पवार भाजप सोबत येतील का? या प्रश्नाचं उत्तर देत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “शरद पवार भाजपसोबत येथील मी असं म्हटलेलं नाही.
अजित पवार आणि त्यांचे सहकारी मोदीजींच्या संकल्पनेला साथ देण्यासाठी येतील, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. त्याचबरोबर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमच्यासोबत येतील, असं देखील आम्हाला कधीच वाटलं नव्हतं.
ज्यावेळी सरकार स्थापन झालं तेव्हा आम्ही एकटे होतो. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या संकल्पनेवर आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजित पवार आणि एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले आहे.
शेवटी प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ निश्चित असते आणि आपल्याला त्या वेळेची वाट बघावी लागते. सध्या शरद पवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मान्यता देत नाही.
मात्र, एक वेळ येईल जेव्हा शरद पवार मोदींचं नेतृत्व मान्य करतील. आज ना उद्या तुम्हाला शरद पवारांच्या विचारांमध्ये परिवर्तन झालेलं दिसेल. देशाच्या कल्याणासाठी शरद पवार एक दिवस नक्की मोदींच्या संकल्पनेला साथ देतील.”
महत्वाच्या बातम्या
- Aditya Thackeray | राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक – आदित्य ठाकरे
- Aditya Thackeray | ये डर अच्छा है; सिनेट निवडणुकांवरून आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- Raj Thackeray | खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक; म्हणाले, “तोडफोड करून…”
- Narendra Modi | पेट्रोलचा दर होणार स्वस्त? महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारची मोठी योजना
- Bacchu Kadu | “छातीवर तलवार ठेवली तरी मंत्रिपद…”; बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी