Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी सर्व पक्षाचे नेते राज्यात दौरे करताना दिसत आहे.
त्याचबरोबर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी राज्यभरात फिरताना दिसत आहे. अशात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. 35 वर्षापासून नगरसेवक असलेले गजानन बारवाल (Gajanan Barwal) यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
Gajanan Barwal has been a corporator for the past 35 years
आज सकाळी गजानन बारवाल यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
गेल्या 35 वर्षापासून गजानन बारवाल नगरसेवक आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या प्रकरणावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या चिंतेत भर पडत आहे.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुका अचानक रद्द करण्यात आल्या आहे. या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, “एकनाथ शिंदे डरपोक होते, घाबरत होते म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षात उडी मारली. त्यांनी भाजपसोबत युती केली नसती तर केंद्र तपास यंत्रणांनी त्यांना अटक केली असती.
राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री निवडणुकांना घाबरत आहे. भाजपनं आतापर्यंत दोन पक्ष फोडले आहे. एक परिवार फोडला आहे. त्यानंतर त्यांनी महाशक्ती स्थापन केली. एवढं सगळं असून देखील त्यांनी मुंबई विद्यापीठाची निवडणूक रद्द केली आहे.
राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. काहीच कारण नसताना त्यांनी सिनेट निवडणुका रद्द केल्या आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री निवडणुकांना घाबरत आहे, म्हणून त्यांनी या निवडणुका रद्द केल्या.”
महत्वाच्या बातम्या
- Bacchu Kadu | अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सरकारचं वाटोळं होईल – बच्चू कडू
- Supriya Sule | राजकारणात मी कशासाठी आले? सुप्रिया सुळेंनी स्पष्ट सांगितलं
- Chandrashekhar Bawankule | नरेंद्र मोदींचं नेतृत्व शरद पवार मान्य करतील – चंद्रशेखर बावनकुळे
- Aditya Thackeray | राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक – आदित्य ठाकरे
- Aditya Thackeray | ये डर अच्छा है; सिनेट निवडणुकांवरून आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल