Share

Vijay Wadettiwar | महाराष्ट्रातील मुख्य खुर्ची बदलणार? विजय वडेट्टीवारांचं खळबळजनक विधान

🕒 1 min readVijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार (Sharad Pawar) भाजपसोबत आले तरचं अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अशात विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठा … Read more

Published On: 

🕒 1 min read

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार (Sharad Pawar) भाजपसोबत आले तरचं अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अशात विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठा बदल झालेला दिसणार आहे.

यामध्ये राज्याची मुख्य खुर्ची देखील बदलू शकते, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

There is going to be a big change in the politics of Maharashtra – Vijay Wadettiwar

प्रसार माध्यमांशी बोलत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “कधी पुण्याचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात तर कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री अनुपस्थित असतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कधीच एकत्र येत नाहीत. दोन उपमुख्यमंत्री आले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसतात. महाराष्ट्रातील जनता हे सर्व नाटक बघत आहे.

सत्तेच्या हव्यासापोटी ही लोकं काहीही करू लागले आहे. येणाऱ्या पंधरा-वीस दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे.

यामध्ये मुख्य खुर्चीपासून बदल सुरू होणार आहे आणि हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. सप्टेंबर महिन्यात राज्यातील सत्ता बदल होणार आहे.”

पुढे बोलताना ते (Vijay Wadettiwar) म्हणाले, “राज्यामध्ये पुढच्या महिन्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. यामध्ये आमची सत्ता येईल असं आम्ही म्हणत नाही.

मात्र, मुख्य खुर्ची बदलणार आहे. सत्तेच्या भुकेपाई यांना लोकांचे प्रश्न दिसेनासे झाले आहे. त्यामुळं हे सरकार टिकणार नाही, असं आम्हाला वाटत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्य खुर्चीला धोका आहे.”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठं विधान केलं होतं. ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाला शरद पवारांची गरज आहे. लोकसभेतील आकडा वाढवण्यासाठी भाजप शरद पवार यांच्या मागे लागली आहे.

त्यासाठी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अजित पवारांना एक अट घातली आहे. शरद पवार आपल्यासोबत आले तरच अजित पवार यांना मुख्यमंत्री पद मिळेल असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणून अजित पवार शरद पवारांना भाजपसोबत येण्याचा आग्रह धरत आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!