Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
ठाकरे गटाच्या या टीकेला आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लवकरच “माजी” खासदार होणारे स्वतःच्या कायम स्वरुपी “माजी” मुख्यमंत्री राहणाऱ्या तुमच्या मालकाला पहिले सांभाळा, असं म्हणतं नितेश राणे यांनी ठाकरे गटाला धारेवर धरलं आहे.
ट्विट करत नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “लवकरच “माजी” खासदार होणारे स्वतःच्या कायम स्वरुपी “माजी” मुख्यमंत्री राहणाऱ्या तुमच्या मालकाला पहिले सांभाळा.
DINO च्या दोस्ताना मुळे पेंग्विन कधी “माजी” मातोश्रीकर होईल हे लवकरच कळेल.. तुम्ही पण पाटकर प्रेमामुळे लवकरच “माजी” भांडुपकर म्हणून जेल मध्ये जाण्याचे दिवस जवळ आले आहेत.
कधी तो शेवटचा अग्रलेख लिहायचा दिवस येईल हे कळणार ही नाही.. मग अंधारात बसून जेल च्या भिंतीवर “माजी माजी माजी” लिहीत रडत बसायला लागेल.. झाकणझुल्या संजय राऊत.”
लवकरच “माजी” खासदार होणारे स्वतःच्या कायम स्वरुपी “माजी” मुख्यमंत्री राहणाऱ्या तुमच्या मालकाला पहिले सांभाळा..
DINO च्या दोस्ताना मुळे पेंग्विन कधी “माजी” मातोश्रीकर होईल हे लवकरच कळेल..
तुम्ही पण पाटकर प्रेमामुळे लवकरच “माजी” भांडुपकर म्हणून जेल मध्ये जाण्याचे दिवस जवळ आले…— Nitesh Rane (@NiteshNRane) August 19, 2023
Devendra Fadnavis was a sensitive person earlier – Samana Editorial
दरम्यान, सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. “देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले.
त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीच सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते.
‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | फडणवीसांचं सत्य तुमच्या घरबश्याला झोबलं; ठाकरे गटाच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर
- Uddhav Thackeray | “देवेंद्र फडणवीस यांची अवस्था अर्धग्लानी…”; ठाकरे गटाचा फडणवीसांवर हल्लाबोल
- Ghulam Nabi Azad | “हिंदू धर्म इस्लामापेक्षा पुरातन…”; गुलाम नबी आझाद यांचं खळबळजनक वक्तव्य
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या चिंतेत वाढ! ठाकरेंच्या बड्या नेत्यांनं केला शिंदे गटात प्रवेश
- Bacchu Kadu | अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सरकारचं वाटोळं होईल – बच्चू कडू