Share

Chandrashekhar Bawankule | संभु जळाला तरी पिळ कायम; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार होते. मात्र, त्यांना हायकमांडने ‘उप’ म्हणून पुन्हा पाठवले, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे. ठाकरे गटाच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड उत्तर दिलं … Read more

Published On: 

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार होते. मात्र, त्यांना हायकमांडने ‘उप’ म्हणून पुन्हा पाठवले, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे. ठाकरे गटाच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

Uddhav Thackeray’s arrogance remains intact – Chandrashekhar Bawankule

ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आज सामनातून देवेंद्र फडणवीसजींच्या विरोधात गरळ ओकली.

2019 साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली, स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलंय.

उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्रजी पुन्हा एकदा सत्तेत आले. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही म्हणून आजही ते ग्लानीत आहेत. ‘सुंभ जळाला तरी पिळ कायम’ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे.

म्हणूनच अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्रजींवर टीका करत आहेत. पण तुमचा हा जळफळाट फार काळ राहणार नाही, कारण येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या उरल्या सुरल्या अहंकाराची लंका जाळून टाकेल. तोवर जनतेच्या पैशातून बांधलेल्या मातोश्री- २ मध्ये तुम्ही आणि बोरूबहाद्दर राऊत टोमणे मारत बसा.”

दरम्यान, उबाठा गटानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं आहे. “मी पुन्हा येईन असे म्हणालो होतो. बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते.

परंतु काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच,” असे श्री. फडणवीस यांनी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा सांगितले आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था आहे.

गेल्या वर्षभरात त्यांचे हे ‘पुनः पुन्हा’ प्रकरण इतक्या वेळा झाले आहे की, जनतेच्या शब्दकोशातून पुन्हा’ हा शब्द बाद होण्याची शक्यता आहे. फणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार होते, पण त्यांच्या हायकमांडने त्यांना ‘उप’ म्हणून पुन्हा पाठवले.

आज हे ‘उप’ एका अननुभवी, बेइमान, भ्रष्ट माणसाच्या हाताखाली काम करीत आहेत. मी येणारच होतो, पण काही लोकांनी बेइमानी केली म्हणून मध्येच लटकलो. पण तरीही आलो. या त्यांच्या बोलण्यात इमानदारीचा जोश नाही”, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही