Ashish Shelar | ठाकरे गटाकडे बोगस मतदार नोंदणीची मशीन आहे? आशिष शेलारांचा खडा सवाल

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुका काल रद्द करण्यात आल्या आहे. या घटनेनंतर ठाकरे गटानं राज्य सरकारला धारेवर धरलं होतं.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे गटाकडे बोगस मतदार नोंदणीची मशीन आहे की काय? असा सवाल देखील आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

Does Ubatha have a bogus voter registration machine or what? – Ashish Shelar

ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “कोरोना काळात परिक्षा न घेण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील तरुणांचे करिअर उध्वस्त करण्याचा घाट घालणाऱ्या उबाठा गटाने आता सीनेटसाठी बोगस मतदार नोंदणी करुन विद्यापीठाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय.

उबाठाकडे बोगस मतदार नोंदणीची मशीन आहे की काय? पेग, पेग्विन, आणि पार्टीवाल्यांना विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय ख्याती, नावलौकिक असा कळणार? यांच्या नादाला लागाल तर तरुणांनो तुम्ही तुमचे शैक्षणिक करिअर उद्ध्वस्त करुन घ्याल!

जर निवडणुकीची एवढीच उबाठा गटाला खूमखूमी असेल तर ही बोगस नावे काढा, आम्ही तुम्हाला चारीमुंड्या चित करू…चला या समोर..आम्ही तयार आहोत!!”

दरम्यान, सिनेट निवडणुका अचानक रद्द केल्यामुळे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह राज्य सरकारवर खोचक टीका केली होती.

ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डरपोक होते, घाबरत होते म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी जर असं केलं नसतं तर केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांना अटक केली असती.

काहीच कारण नसताना अचानक सिनेट निवडणुका रद्द करण्यात आल्या आहे. निवडणूक रद्द करण्यामागचं कारण काय? निवडणूक रद्द करण्यासाठी झालेली बैठक कुठे झाली? किती वाजता झाली? कुणाच्या घरी झाली? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. मात्र, या प्रश्नांचे उत्तरं कुणालाच माहीत नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.