🕒 1 min read
Chandrashekhar Bawankule | मुंबई: विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केलं आहे.
सप्टेंबर महिन्यात राज्यातील सत्ता बदलणार. त्याचबरोबर राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तवव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath Shinde will remain the Chief Minister till 2024 – Chandrashekhar Bawankule
माध्यमांशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “2024 पर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री राहतील, हे देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षातील वरिष्ठांनी स्पष्ट केलं आहे.
त्याचबरोबर आगामी निवडणूक एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र लढणार आहेत.
मात्र, विरोधी पक्षनेता म्हणून विजय वडेट्टीवार यांना बोलावं लागतं. म्हणून ते काहीही बडबड करतात. राज्यामध्ये सध्या 200 पेक्षा अधिक बहुमत असलेलं सरकार आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे आमचे नेते आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे आणि तेच मुख्यमंत्री राहतील असं आमच्या वरिष्ठांनी स्पष्ट केलं आहे. विरोधकांनी कितीही अशा प्रकारचे स्वप्न बघितले तरी त्यांचे ते स्वप्न साकार होणार नाही.”
दरम्यान, राज्याच्या राजकीय परिस्थितीबाबत विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कधीच एकत्र येत नाही.
कधी पुण्याचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात तर कधी नागपूरचे. तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असले तर एकनाथ शिंदे अनुपस्थित असतात. हे सर्व नाटक महाराष्ट्रातील जनता बघत आहे.
येत्या पंधरा-वीस दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठा बदल झालेला दिसणार आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यातील सत्ता बदल होईल. पुढच्या महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | सामना वृत्तपत्राची आम्ही तक्रार करणार – चंद्रशेखर बावनकुळे
- Ashish Shelar | ठाकरे गटाकडे बोगस मतदार नोंदणीची मशीन आहे? आशिष शेलारांचा खडा सवाल
- Sanjay Raut | अजून खरी मिरची झोंबायची बाकी; संजय राऊतांचा भाजपला इशारा
- Vijay Wadettiwar | महाराष्ट्रातील मुख्य खुर्ची बदलणार? विजय वडेट्टीवारांचं खळबळजनक विधान
- Chandrashekhar Bawankule | संभु जळाला तरी पिळ कायम; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










