Raj Thackeray | सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी जन्माला येत नाही – राज ठाकरे

Raj Thackeray | पिंपरी चिंचवड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पिंपरी चिंचवड शहरामध्ये कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये त्यांनी पत्रकारांचा सन्मान केला आहे.

त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांनी उपस्थित असणाऱ्यांना संबंधित केलं आहे. यावेळी बोलत असताना राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

जन्माला येताना कोणीच सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर यावेळी बोलत असताना त्यांनी पत्रकारांवर देखील भाष्य केलं आहे.

No press conference should be held in rural Maharashtra – Raj Thackeray

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “मला असं वाटतं की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेऊ नये. कारण त्यांच्याकडे आम्हाला विचारायला प्रश्न नसतात. उत्कृष्ट आणि चांगलं काम करणारे अनेक पत्रकार आहे.

मात्र, सध्या राजकारणाचा स्तर खूप खालावला आहे. सध्या राजकारणातील अनेक लोक वाहियातपणे बोलताना दिसत आहे. प्रसार माध्यमं त्यांना दाखवतात म्हणून ते काहीही बडबड करतात.”

पुढे बोलताना ते (Raj Thackeray) म्हणाले, “तुमच्या सभांना खूप गर्दी असते मात्र तुम्हाला मत मिळत नाही, असं पत्रकार मला नेहमी म्हणतात. मात्र, मी त्यांना सांगू इच्छितो की सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नसतो.

सत्ता एकदा हातात आली की ती जायला सुरुवात होते. त्याचबरोबर सत्ताधारी नेहमी हरत असतो आणि विरोधक नेहमी जिंकत असतो. सत्ता किती आणि कशी टिकवायची एवढीच एक गोष्ट तुमच्या हातात असते.”

“प्रसार माध्यमांनी बोलताना थोडी दक्षता घ्यायला हवी. कारण अनेकांचा मागचा पुढचा अभ्यास नसतो तर काहींना इतिहास माहीत नसतो. म्हणून मी या लोकांना उत्तर देण्याची टाळाटाळ करतो.

पत्रकारांना काही बोललं तर त्यांच्या कुटुंबीयांना वाईट वाटतं. मात्र, पत्रकार जेव्हा आमच्याबद्दल वाईट बोलतात तेव्हा आमच्या कुटुंबांना वाईट वाटत नसेल का? पत्रकारांनी या गोष्टीचा थोडं भान ठेवायला हवं”, असही ते (Raj Thackeray) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.