Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: आज ठाकरे गटानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चांगलं धारेवर धरलं आहे. सकाळी सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली.
त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस आधी अजित दादांना पीसींग-पीसिंग म्हणायचे आणि आता त्यांचं अजित दादांसोबत किसिंग-किसिंग चालू आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी बातचीत करत असताना अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाच्या हाताखाली राज्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला काम करावं लागत आहे. आज सामनाने देखील त्यांना सांभाळून राहा असं सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याविरुद्ध बैलगाडीवर पुरावे घेऊन आंदोलन करत होते. आधी ते अजित दादा चक्की पिसिंग-पिसिंग म्हणायचे आता त्यांचं अजित दादा किसिंग किसिंग चालू आहे.”
Shinde group and BJP will be buried by Uddhav Thackeray – Ambadas Danve
पुढे बोलताना ते (Ambadas Danve) म्हणाले, “शिंदे गट आणि भाजपला उद्धव ठाकरे पुरून उरणार आहे. आगामी निवडणुकांसाठी कोणी कितीही गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेलं असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांना पराभूत करणार आहोत.
आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच विजय होईल. भारतीय जनता पक्ष ग्राहक वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. जुन्या लोकांना भारतीय जनता पक्ष कुठेतरी स्टोरेजमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपमध्ये मूळ नेते बोटावर मोजणे इतके राहिले आहेत.”
दरम्यान, सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी, कर्तबगार नेत्याला बिनपगारी उपअधिकारी करून टाकले. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वच बाबतीत व क्षेत्रांत चिंतेची स्थिती निर्माण झाली.
फडणवीस हे भांबावलेल्या मनस्थितीत असल्याने राज्यातील कायदा- सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनली आहे. तरुण मुली व महिलांवर दिवसाढवळया भररस्त्यांवर हल्ले होत आहेत.
खुनाखुनी सुरू आहे. त्यावर बोलायचे सोडून गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी पुन्हा पुन्हा पुन्हा’चे तुणतुणे वाजवणे सुरू ठेवावे हे योग्य नाही.
फडणवीस ‘उप’ म्हणून पुन्हा आले ते ‘उप’पददेखील संपूर्ण नाही आता दिल्लीश्वरांनी अजित पवारांनादेखील ‘उप’ करून फडणवीसांची अवस्था बिकट केली”, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | विरोधकांचं ‘ते’ स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे बरसले
- Chandrashekhar Bawankule | सामना वृत्तपत्राची आम्ही तक्रार करणार – चंद्रशेखर बावनकुळे
- Ashish Shelar | ठाकरे गटाकडे बोगस मतदार नोंदणीची मशीन आहे? आशिष शेलारांचा खडा सवाल
- Sanjay Raut | अजून खरी मिरची झोंबायची बाकी; संजय राऊतांचा भाजपला इशारा
- Vijay Wadettiwar | महाराष्ट्रातील मुख्य खुर्ची बदलणार? विजय वडेट्टीवारांचं खळबळजनक विधान