Uddhav Thackeray | “एकनाथ शिदेंनी विश्वास शब्दाची विल्हेवाट…”; ठाकरे गटाची CM शिंदेंवर खोचक टीका

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना यावर्षी पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, उदय सामंत यांनी विश्वास शब्दाची विल्हेवाट लावली असल्याचं आजचा सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Samana Editorial

रतन टाटा म्हणतात की, “व्यवसायाचा अर्थ नफा मिळवणे नव्हे, तर समाजाबद्दल असलेली आपली जबाबदारी समजून घेणे होय.” ही बांधीलकी टाटा आजही जपत आहेत. त्यांना उद्योगात चोऱ्या करून नफा नकोय, पण त्यांना पुरस्कार देणाऱ्यांचे काय?

त्यांचे हात चोऱ्या-लुटमारीत गुंतल्याने त्यांनी विश्वास नष्ट करून पक्षांतरे केली. अशा लोकांकडून श्री. रतन टाटांसारख्या विश्वासपात्र लोकांना पुरस्कार स्वीकारावा लागतो हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

विश्वासराव पानिपतात मारले गेले किंवा हरवले यावर इतिहास आजही चिवडला जातोय. मात्र देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणातून विश्वास संपला आहे.

राजकारण हे खोटेपणाच्या व अविश्वासाच्या पायावर उभे आहे. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच रोज खोटे बोलत आहेत अशा खोटेपणाच्या वातावरणात महाराष्ट्र सरकारने उद्योगपती रतन टाटा यांचा ‘उद्योगरत्न पुरस्काराने गौरव केला.

हा पुरस्कार मुख्यमंत्री रिशद यांच्या हस्ते प्रदान केला व देवेंद्र फडणवीस, अजित पवार वगैरे लोक त्या सोहळयास उपस्थित होते या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “टाटा म्हणजे ट्रस्ट टाटा म्हणजे विश्वास” प्रश्न असा आहे की, अशा विश्वासपात्र व्यक्तीला पुरस्कार देणाऱ्यांनी ‘विश्वास’ शब्दाची हत्याच केली.

अजित पवार, शिंद, केसरकर, उद्योगमंत्री सामंत यांनी ‘विश्वास’ शब्दाची विल्हेवाट लावली व ते टाटांच्या निमित्ताने ‘ट्रस्ट, ‘विश्वास’ अशा शब्दांची महती गात आहेत. टाटा म्हणजे ट्रस्ट मग ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्यांची टाटांना पुरस्कार प्रदान करण्याची योग्यता खरोखरच आहे काय? टाटा यांचे राष्ट्र उभारणीत योगदान मोठे आहे.

मिठापासून विमानापर्यंतच्या उद्योगांत टाटा आहेत. टाटांनी महाराष्ट्रास कर्मभूमी मानले व उद्योगाचा विस्तार देशात केला. भारतीय उद्योगाचा पाया टाटांनी घातला तो विश्वासाच्या बळावर देश लुटून व राजकारण्यांची हाजी हाजी करून त्यांनी आपले वाढवले नाही.

‘आधी राष्ट्र, मग नफा हा त्यांचा मंत्र. त्यामुळे इतर उद्योगांप्रमाणे चारसोबिसी करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. टाटा म्हणजे विश्वास ग्राहकांची पहिली पसंती ही टाटांच्या उत्पादनांनाच असते. कारण टाटांच्या निष्ठा कधी बदलल्या नाहीत.

मात्र देशाच्या राजकारणाची सध्या काय अवस्था आहे? आज राजकारण हा फसवाफसवीचा उद्योग बनला आहे. टाटांच्या उद्योगांवर कधी धाडी पडल्या नाहीत, पण टाटांना ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्या महानुभावांच्या उद्योगांवर धाडी पडत असल्याने विश्वासाची ऐशी की तैशी करून या सगळय़ांनी पक्षांतर केले व टाटांना पुरस्कार देण्यासाठी पुढे आले.

टाटा यांचे मुंबई महाराष्ट्राशी एक भावनिक नाते आहे. टाटांच्या पूर्वजांनी मुंबईत अनेक सामाजिक, वैद्यकीय संस्था उभ्या केल्या. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात टाटांनी सढळ हस्ते मदत केली.

कोरोना काळात ‘पीएम केअर्स फंडात टाटांनी मोठे योगदान दिले व त्या योगदानाचा हिशेब काही समोर आला नाही. टाटा यांनी मुंबई- महाराष्ट्रात उद्योग उभे केले. पुण्यातील ‘टेल्को’ हा वाहननिर्मितीचा कारखाना म्हणजे भव्य शहरच आहे.

महाराष्ट्राच्या आर्थिक उलाढालीत टाटांचे योगदान मोलाचे आहे व कोणी दबाव आणला म्हणून टाटांनी त्यांचे उद्योग गुंडाळून गुजरातेत हलवले नाहीत.

‘उद्योगरत्न’ म्हणून टाटांचा गौरव करताना महाराष्ट्राच्या घसरत चाललेल्या औद्योगिक क्षेत्राची चिंता शिंद पवार फडणवीस सरकारला आहे काय? महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या कमजोर, खिळखिळा करण्याचा उद्योग केंद्राने चालवला आहे.

महाराष्ट्रातील अनेक उद्योग, आर्थिक उलाढालींची केंद्रे गुजरातेत खेचून नेली जात आहेत. महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थकारण व सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे उपद्व्याप सुरू आहेत. महाराष्ट्राची लूट सुरू आहे व त्या लुटीस हातभार लावणाऱ्यांच्या हातून टाटांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला.

टाटा म्हणजे विश्वास है सांगणाऱ्यांनी जनमानसातून विश्वास गमावला आहे. पवार, शिंद, फडणवीस हे लोकांच्या विश्वासास पात्र राहिलेले नेतृत्व नाही.

अविश्वासाचे जुगाड करून सत्तेवर आलेले हे त्रिकुट आहे. रतन टाटा है जगाच्या खोटय़ा दिखाव्यांवर विश्वास ठेवत नाहीत ते साधे राहतात. उच्च विचारांचे ते शालीन व्यक्तिमत्त्व आहे.

रतन टाटा म्हणतात की, “व्यवसायाचा अर्थ नफा मिळवणे नव्हे, तर समाजाबद्दल असलेली आपली जबाबदारी समजून घेणे होय.” ही बांधीलकी टाटी आजही जप आहेत.

त्यांना उद्योगात चोऱ्या करून नफा नकोय, पण त्यांना पुरस्कार देणाऱ्याचे काय? त्यांचे हात चोऱ्या-लुटमारीत गुतल्याने त्यांनी विश्वास नष्ट करून पक्षांतरे केली सत्ता हा चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या बदमाशांचा अखेरचा अड्डा बनला आहे. अशा लोकांकडून श्री रतन टाटांसारख्या विश्वासपात्र लोकांना पुरस्कार स्वीकारावा लागतो हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

सौजन्य – सामना

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.