Chitra Wagh | “तुरुंगाची नशा तुमच्यात भिनलेली…; चित्रा वाघांचा संजय राऊतांवर घणाघात

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: सामना अग्रलेखाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धारेवर धरलं आहे. संजय राऊत यांच्या मनात तुरुंगाची नशा भिनलेली दिसत आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray was running the state from home – Chitra Wagh

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “ओ सर्वज्ञानी….रडत राऊत पक्षाने दिलेली जबाबदारी शिरसावंद्य मानून स्वीकारणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी आपल्या या कृतीने राजकारणात आदर्श निर्माण केलाय.

ते सर्वांच्या आदरास पात्र ठरलेत. दुसरीकडे तुम्ही आणि तुमचा पट्टा ज्यांच्या हातात आहे ते उद्धव ठाकरे मात्र जनतेच्या मनातून पार उतरला आहात. तुरूंगाची नशा तुमच्यात इतकी भिनलेली दिसतेय की, बोलण्यात ताळतंत्र राहिलेलं नाही.

तुम्ही इतरांच्या ग्लानीची उठाठेव करू नका. देवेंद्रजींनी त्यांचं ‘उप’ मुख्यमंत्रीपदही जनतेच्या कल्याणासाठी वाहिलंय. तुमचे ‘चूप’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र घरातूनच राज्याचा कारभार हाकत महाराष्ट्राच्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प बसले होते.

हाल-अपेष्टा भोगणाऱ्या जनतेच्या आसवांकडे दुर्लक्ष करणारे ठाकरे तेव्हा कोणते ‘आसव’ घेऊन राज्य चालवीत होते, हेही एकदा सांगूनच टाका… तुमची पातळीहीन शब्दधुंदी नेमक्या कुठल्या पेयाच्या प्रभावामुळे आहे, हेही जनतेला कळू द्या.

दरम्यान, सामना अग्रलेखच्या माध्यमातून ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ” झोपलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेऊन पडलेल्यांना जागे कसे करायचे, हा प्रश्न नेहमीच असतो. महाराष्ट्रात सध्या हा प्रश्न निर्माण झाला आहे तो भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत.

एक आपले मुख्यमंत्री, ते सहसा झोपत नाहीत दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस, ते सदैव अर्थग्लानी अवस्थेत आहेत. “मी पुन्हा येईन असे म्हणालो होतो.

बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते, परंतु काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच,” असे श्री. फडणवीस यांनी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा सांगितले आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था आहे.

गेल्या वर्षभरात त्यांचे हे ‘पुनः पुन्हा’ प्रकरण इतक्या वेळा झाले आहे की, जनतेच्या शब्दकोशातून पुन्हा’ हा शब्द बाद होण्याची शक्यता आहे. फणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार होते, पण त्यांच्या हायकमांडने त्यांना ‘उप’ म्हणून पुन्हा पाठवले”, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.