Sanjay Raut | संजय राऊत लढवणार ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत 2024 लोकसभा निवडणूक लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासह महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली असल्याचं बोललं जात आहे. संजय राऊत मुंबईतील ईशान्य मुंबई मतदार संघातून ही निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे.

Sanjay Raut will contest the Lok Sabha elections

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवावी आणि मग आमच्यावर भाष्य करावं, असं शिंदे गटाकडून सातत्यानं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असेल. या आधी संजय राऊत चार वेळा राज्यसभेवर निवडून आले आहे.

तर 2024 मध्ये ते लोकसभा निवडणूक लढताना दिसणार आहे. या निवडणुकीमध्ये ईशान्य मुंबईत भाजपचे मनोज कोटक आणि संजय राऊत आमने-सामने आलेले दिसणार आहे.

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) लोकसभा निवडणूक लढणार असल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. या विषयावर संजय राऊत यांनी देखील अनेकदा प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना ठाकरे गटाची जबाबदारी माझ्यावर आहे. इतर उमेदवारांचा प्रचार आणि प्रसार करून त्यांना शक्ती आणि बळ देण्याचं काम मी करतो.

म्हणून मी जर निवडणूक त्यांच्या भानगडीत पडलो तर मी एका मतदारसंघांमध्ये अडकून बसेल. त्यामुळं माझं पक्षातील इतर उमेदवारांवर दुर्लक्ष होऊ शकतं, असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.