Chandrakant Khaire | नांदेड: गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यामध्ये अनेक ठिकाणी दंगली झाल्या होत्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, अहमदनगर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड झाल्याची दिसून आली होती.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता पक्षानं राज्याच्या राजकारणात दंगलीचं राजकारण केलं असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
BJP is playing riot politics in Maharashtra – Chandrakant Khaire
नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष दंगलीचं राजकारण करत आहे.
राज्यात महाविकास आघाडीसोबत दलित आणि मुस्लिम बांधव येऊ नये, म्हणून भाजपनं हे सर्व केलं आहे. महाविकास आघाडीला मुस्लिम आणि दलितांचा पाठिंबा मिळू नये म्हणून हे केलं जात आहे.
आतापर्यंत राज्यात सात दंगली घडल्या आहे आणि हे भाजपचं कटकारस्थान आहे. हिंदू-मुस्लिम यांना भडकवायचं आणि जातीय तेढ निर्माण करायची, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे.”
दरम्यान, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
संजय राऊत आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“पक्षानं सांगितलं तर आम्ही काहीही करू शकतो. पक्षानं आदेश दिला तर आम्ही तुरुंगात जातो. पक्षाची गरज, पक्षाचा आदेश आणि पक्षप्रमुखांचा आदेश जो असेल तो मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. त्यामुळं पक्षांनं जर आदेश दिला तर मी निवडणुका देखील लढू शकतो.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | लोकसभा निवडणुका लढवणार? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं
- Eknath Shinde | “ऐश्वर्या राय सारखे रोज मासे खा अन्…”; शिंदे गटातील नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
- Uddhav Thackeray | “एकनाथ शिदेंनी विश्वास शब्दाची विल्हेवाट…”; ठाकरे गटाची CM शिंदेंवर खोचक टीका
- Sanjay Raut | संजय राऊत लढवणार ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Chitra Wagh | “तुरुंगाची नशा तुमच्यात भिनलेली…; चित्रा वाघांचा संजय राऊतांवर घणाघात