Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. कारण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांसह महायुती सरकारमध्ये सामील झाले.
त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राज्याच्या राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. अशात शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataparao Jadhav) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा एक मोठा गट महायुतीत सामील होणार असल्याचं प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहे.
Senior Congress leaders are very upset – Prataparao Jadhav
माध्यमांशी बातचीत करत असताना प्रतापराव जाधव म्हणाले, “वरिष्ठ लोकांना सोडून विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यासारख्या ज्युनिअर व्यक्तीला विधानसभा विरोधी पक्षनेते पद देण्यात आलं आहे.
यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाराज असून अतिशय अस्वस्थ झाले आहे. मला त्या नेत्यांची नावं घेण्याची गरज वाटत नाही. मात्र, ते सर्व नेते अतिशय अस्वस्थ आहेत. त्यामुळं काँग्रेस पक्षातील ते नेते महायुतीत सहभागी होणार आहेत. सध्या ते हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.”
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भारतीय जनता पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले, “भाजपने महाराष्ट्रामध्ये दंगलीचं राजकारण केलं आहे.
मुस्लिम आणि दलित बांधव महाविकास आघाडीसोबत येऊ नये, म्हणून भाजपनं हे सर्व केलं आहे. जातीय तेढ निर्माण करायची हिंदू आणि मुस्लिम यांना भडकवायचं, हे सर्व भाजपचं कट कारस्थान आहे. आतापर्यंत राज्यात सात दंगली घडल्या आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Chandrakant Khaire | महाराष्ट्रात भाजपनं दंगली घडवल्या – चंद्रकांत खैरे
- Sanjay Raut | लोकसभा निवडणुका लढवणार? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं
- Eknath Shinde | “ऐश्वर्या राय सारखे रोज मासे खा अन्…”; शिंदे गटातील नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
- Uddhav Thackeray | “एकनाथ शिदेंनी विश्वास शब्दाची विल्हेवाट…”; ठाकरे गटाची CM शिंदेंवर खोचक टीका
- Sanjay Raut | संजय राऊत लढवणार ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण