Nitesh Rane | “संजय राऊतांची लायकी…”; नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आगामी लोकसभा निवडणुका लढणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

या प्रकरणावर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पक्षानं सांगितलं तर मी निवडणूक लढवेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिम्मत असेल तर संजय राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा लढवून दाखवावी, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut deserves to be elected as a Sarpanch – Nitesh Rane 

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “जर पक्षाने आदेश दिला तर मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवेल, असं संजय राजाराम राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत स्वतःच्या वार्डामध्ये त्यांच्या गटाचा नगरसेवक निवडून आणू शकला नाही. कारण ज्या वार्डमध्ये संजय राऊत यांचं घर आहे, त्या वार्डचा नगरसेवक काँग्रेस पक्षाचा आहे.

संजय राऊत यांची लायकी सरपंचाच्या निवडणुकीची आहे. त्यामुळे संजय राजाराम राऊत यांनी आधी सरपंचाची निवडणूक लढवावी आणि मग पुढे बोलावं.

संजय राऊत यांना जर खरंच निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी सिंधुदुर्गमध्ये यावं आणि मग निवडणूक लढवावी. तिथे त्यांचा डिपॉझिट राहतो का ते बघूया?

ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादीची आहे. संजय राऊत शरद पवारांच्या गटात जाणार आहे, असं मी वारंवार सांगत आहे. तेच आता खरं होताना दिसत आहे.”

दरम्यान, या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आम्ही पक्षाने आदेश दिला तर काहीही करू शकतो.

पक्षाने आदेश दिला तर आम्ही तुरुंगात देखील जाऊ शकतो. आम्ही पक्षाचा आदेश आणि पक्षप्रमुखांचा आदेश मानणारी लोक आहोत. त्यामुळं जर पक्षाने आदेश दिला तर मी निवडणुक लढू शकतो.”

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.