Share

Rohit Pawar | तलाठी भरतीत काही काळंबेरं आहे? रोहित पवारांचा राज्य सरकारला खडा सवाल

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये आज तलाठी भरतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान गदारोळ झाल्याचं दिसून आलं आहे.

आज अनेक परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात व्यत्याय निर्माण झाला. तर गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये देखील या परीक्षांबाबत असाच धक्कादायक प्रकार घडला होता.

या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे. या परीक्षेबाबत सरकारला काही सिरीयसनेस आहे की नाही? असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Due to the server down, the exam has been disrupted in the entire state – Rohit Pawar

ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करुनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन.

ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागतेय.. सकाळी ८ वाजता रजिस्ट्रेशन सुरु होणं अपेक्षित असताना सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबलीय.. या सरकारला काही #SERIOUSNESS आहे की नाही? की यात काही काळंबेरं आहे?

दरम्यान, आज सकाळी 09 ते 11 या दरम्यान तलाठी भरतीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु ऐनवेळी अनेक जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याचं दिसून आलं आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थित परीक्षा देता आली नाही. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अकोला या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना या समस्येला सामोरं जावं लागलं. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं असल्याचं दिसून आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये आज तलाठी भरतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान गदारोळ झाल्याचं दिसून आलं आहे. आज …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now