Raj Thackeray | “…अन्यथा अजित पवारांच्या सभेत राडा करू”; पवारांच्या सभेविरोधात मनसे आक्रमक

Raj Thackeray | बीड: 27 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यामध्ये अजित पवार यांची सभा पार पडणार आहे. त्यांच्या या सभेपूर्वी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. आमच्या जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक विमा घोषित करा, असं म्हणत मनसेने आंबेजोगाई शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यावर धडक मोर्चा काढला आहे.

Declare drought in Beed district – Sumant Dhas

अजित पवार यांची 27 तारखेला बीड जिल्ह्यात जाहीर सभा पार पडणार आहे. त्यांच्या या सभेपूर्वी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा अन्यथा पवारांच्या सभेत घुसून राडा करून सभा उधळून लावू, असा इशारा मनसे (Raj Thackeray) जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेला असून शेतकऱ्यांनी उभी पिकं कापायला सुरुवात केली आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना शेतकऱ्यांच्या समस्यांशी काही घेणं-देणं नाही. उलट त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) सभेला उत्तर देण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये अजित पवारांची सभा आयोजित केली आहे.

धनंजय मुंडे अजित पवारांच्या सभेची तयारी करत आहे. मात्र, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं लक्ष द्यायचं नाही, असं सुमंत धस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 17 ऑगस्ट 2023 रोजी बीड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली होती. त्यांच्या या सभेला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.

तर या सभेमध्ये बोलत असताना शरद पवारांनी शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारवर खोचक टीका केली होती. त्यामुळे शरद पवारांच्या सभेला सडेतोड उत्तर देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात अजित पवारांची जाहीर सभा आयोजित केली आहे.

अजित पवारांच्या या सभेनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. त्यामुळं अजित दादांच्या या सभेकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.