Deepali Sayed | कोणी व्हील चेअर मागवा रे; दिपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं

Deepali Sayed | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रस्त्याच्या खड्ड्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं.

महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी त्यांच्या भाषणातून रस्त्यावरील खड्ड्यावरून सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. मुंबई-गोवा महामार्गावर आमचं आंदोलन सुरू झालं आहे.

त्याचबरोबर येत्या काळात आम्ही मुंबई-नाशिक हायवेवर देखील आंदोलन करू शकतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेत्या दिपाली सय्यद यांनी मनसेवर खोचक टीका केली आहे.

मनसेने खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली तर त्यांचे एकाचे दोन आमदार होतील, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत दिपाली सय्यद (Deepali Sayed) म्हणाल्या, “मनसेच्या जागर यात्राने भविष्यात शॅडो मंत्रीपद वाढेल पन यात्रेतरस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम घेतली तर एकाचे दोन आमदार होतील आणि युवा नेते शॅडो मंत्री बनतील.

यात्रेत राष्ट्राच्या संपतीचे नुकसान नको,देशपांडेना अजुनही डॅाक्टरची गरज आहे, ते लवकरच बरे होतील,कोणी व्हिल चेअर मागवा रे!”

Our agitation is going on on the issue of pothole on the road – Raj Thackeray

दरम्यान, पुण्यात बोलत असताना राज ठाकरे यांनी खड्ड्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले, “रस्त्यावरील खड्ड्याच्या मुद्द्यावरून आमची मुलं अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरली आहे.

त्याचबरोबर या प्रकरणावरून त्यांचं अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालं आहे. त्यांच्या या आंदोलनाला मी काहीच करू शकत नाही. कारण गेल्या अनेक वर्षापासून लोक या समस्येचा सामना करत आहे.

मात्र, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की जे प्रतिनिधी लोकांच्या समस्या सोडवू शकत नाही, लोक त्यांनाच का नेहमी निवडून देतात? मतपेटीतून लोकांचा राग जोपर्यंत उतरणार नाही तोपर्यंत रस्त्यावरचे खड्डे बुजणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.