Amol Mitkari | मुंबई: राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित (Vijay Kumar Gavit) यांनी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
ऐश्वर्या राय समुद्रकिनारी राहते. त्यामुळे ऐश्वर्या राय दररोज मासे खायची. म्हणून तिची त्वचा आणि डोळे सुंदर आहे, असं विजय कुमार गावित यांनी म्हटलं होतं.
त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय कुमार गावित आदिवासींचे प्रश्न सोडून ऐश्वर्या रायचे डोळे पाहत असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
Vijay Kumar Gavit is not very serious about tribal issues – Amol Mitkari
विजय कुमार गावित यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “विजय कुमार गावित यांनी केलेल्या वक्तव्यावर हसावं की रडावं तेच कळत नाही.
महाराष्ट्रामध्ये आमच्या भागासह अनेक ठिकाणी कुपोषणाची समस्या गंभीर होत चालली आहे. मात्र, गावित त्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी ऐश्वर्या रायचे डोळे बघत असतील, तर त्यांना आदिवासींच्या समस्यांबद्दल फार गांभीर्य नाही. गावित यांनी अशा प्रकारचे फालतू वक्तव्य करण्यापेक्षा आदिवासींच्या प्रश्नांकडं लक्ष घ्यावं.”
दरम्यान, विजय कुमार गावित यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “विजयकुमार गावित यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्यानं या वयात असं बोलायला नाही पाहिजे. गावित स्वतः डॉक्टर आहे. त्यांनी मजा मस्करीमध्ये हे विधान केलं असेल.
मात्र, ते एक लोकप्रतिनिधी आहे. हे त्यांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे. तुम्ही मस्करीमध्ये अशा प्रकारचं बोलतात. मात्र लोक याला गांभीर्याने घेतात.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat | “त्यांनी या वयात असं बोलायला…”; गावितांनी ऐश्वर्या रायवर केलेल्या विधानावर शिरसाटांची प्रतिक्रिया
- Raj Thackeray | “…अन्यथा अजित पवारांच्या सभेत राडा करू”; पवारांच्या सभेविरोधात मनसे आक्रमक
- Deepali Sayed | कोणी व्हील चेअर मागवा रे; दिपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं
- Bacchu Kadu | “… तर आम्ही सरकारच्या विरोधात उभं राहू”; बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया
- Sanjay Shirsat | संजय राऊत निवडणूक लढवणार याचा आम्हाला आनंद – संजय शिरसाट