Vijay Wadettiwar | मुंबई: काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी तिखट शब्दात राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.
सरकारमध्ये तीन तिघाडा आणि काम बिघाडा आहे. या सर्व राजकारणाला राज्यातील जनता वैतागली असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार त्यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Who is in control of the current government? – Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “सध्या सरकारमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा सुरू आहे. कोण काय प्रतिक्रिया देतो? कोण काय बोलत? कोण कुणावर कुरघोडी करतो? तर कुणी माझी बायको आत्महत्या करेल, म्हणून मंत्रीपद द्या असं सांगतो.
सरकारच्या या सर्व राजकारणाला महाराष्ट्रातील जनता वैतागली आहे. सध्या नक्की सरकार कोण चालवत आहे? मुख्यमंत्र्यांवर उपमुख्यमंत्री कुरघोडी करतात. नक्की मुख्यमंत्री कोण कळतच नाही? सध्याच्या सरकारवर कुणाचा कंट्रोल आहे? हे कळतच नाही.”
पुढे बोलताना ते (Vijay Wadettiwar) म्हणाले, “राज्यात आधी सरकारचं नाटक सुरू होतं. या नाटकाचं आता तमाशामध्ये रूपांतर होताना दिसत आहे.
या तमाशामध्ये कोणीतरी तुतारी वाजवताना दिसेल तर कोणी नाचाची भूमिका बजावेल. त्याचबरोबर कोणीतरी एकजण पायाला घुंगरू बांधून नाचेल.
राज्यातील जनतेला हा तमाशा लवकरच दिसणार आहे. सध्याचे सरकार हे ट्रिपल इंजिन सरकार आहे. मात्र, या इंजिनला ड्रायव्हर नाही. जो येईल तो हे इंजिन चालवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.”
यावेळी बोलत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी कांद्याच्या मुद्द्यावरून देखील राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले, “कांदा खाणं परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, असं काही लोक म्हणत आहे.
मात्र , उद्या तेल आणि साखर महाग झाली तर ती पण खाणं बंद करायची का? ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी पोटभर खायचं आणि जे गरीब आणि मध्यमवर्गीय आहे, त्यांनी उपाशी राहायचं का? महागाई पोटी जनतेनं उपाशी मरावं का?, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil | आमच्यात आणि अजित पवार गटात वाद सुरू? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
- Uddhav Thackeray | “मोदी सरकारचे ‘खायचे दात’ अन्…”; ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- Amol Mitkari | गावित आदिवासींचे प्रश्न सोडून ऐश्वर्या रायचे डोळे बघतात – अमोल मिटकरी
- Sanjay Shirsat | “त्यांनी या वयात असं बोलायला…”; गावितांनी ऐश्वर्या रायवर केलेल्या विधानावर शिरसाटांची प्रतिक्रिया
- Raj Thackeray | “…अन्यथा अजित पवारांच्या सभेत राडा करू”; पवारांच्या सभेविरोधात मनसे आक्रमक