Share

Uddhav Thackeray | “मोदी सरकारचे ‘खायचे दात’ अन्…”; ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. गेल्या महिन्यात टोमॅटोचा दर 200 रुपयांच्या पार गेला होता. तर कांद्याचे दरही त्याचप्रमाणे चालले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोदी सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ही मोदी सरकारची खरी धास्ती आणि भीती आहे. कांद्याचे निर्यात शुल्क तब्बल 40 टक्के वाढविण्याचा निर्णय तडकाफडकी याच … Read more

Published On: 

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. गेल्या महिन्यात टोमॅटोचा दर 200 रुपयांच्या पार गेला होता.

तर कांद्याचे दरही त्याचप्रमाणे चालले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोदी सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ही मोदी सरकारची खरी धास्ती आणि भीती आहे.

कांद्याचे निर्यात शुल्क तब्बल 40 टक्के वाढविण्याचा निर्णय तडकाफडकी याच भीतीतून घेतला गेला आहे. दरवाढ नियंत्रण आणि जनतेचे हित वगैरे दाखवायचे दात आहेत, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Samana Editorial

टोमॅटोने गेल्या महिन्यात 200 रुपयांचा आकडा पार केला होता. उद्या कांद्यानेही त्याच्याच पावलावर पाऊल टाकले तर आधीच महागाईत होरपळणारी जनता तोंडावर आलेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रातील सत्तापक्षावर ‘मतबंदी’ची कुन्हाड चालवेल.

ही मोदी सरकारची खरी धास्ती आणि भीती आहे. कांद्याचे निर्यात शुल्क तब्बल 40 टक्के वाढविण्याचा निर्णय तडकाफडकी याच भीतीतून घेतला गेला आहे. दरवाढ नियंत्रण आणि जनतेचे हित वगैरे दाखवायचे दात आहेत.

सामान्य कांदा उत्पादकाच्या पोटावर मारलेली निर्यात शुल्क वृद्धीची लाथ हे मोदी सरकारचे ‘खायचे दात’ आहेत. निर्णयत्रस्त बळीराजा आणि महागाईग्रस्त जनता उद्याच्या निवडणुकीत सत्तापक्षाचे हे दात त्यांच्याच घशात घातल्याशिवाय राहणार नाही.

शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार प्रत्यक्षात बळीराजाला मिळणारे उत्पन्नदेखील मिळू नये असाच कारभार करीत आहे.

या सरकारचे धोरण ना शेतकरी हिताचे आहे ना ग्राहकांच्या फायद्याचे त्यातही शेतमालाबाबतचे निर्णय एवढया उफराट्या पद्धतीने घेतले जात आहेत की, जास्तीचे चार पैसेही शेतकऱ्यांच्या खिशात पडू नयेत.

कांदा उत्पादकांना तर हा अनुभव नेहमीचाच झाला आहे आतादेखील कांद्याच्या निर्यात शुल्कात थेट 40 टक्क्यांची वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय शेतकयाच्या मुळावरच आला आहे.

कांद्याचे चढे दर नियंत्रणात यावेत म्हणून निर्यात शुल्क वाढविले, असा बचाव सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र त्यामुळे कांदा उत्पादकाच्या जास्तीच्या उत्पन्नाला चाळणी लागली त्याचे काय? सरकारने निर्यात शुल्क वाढवल्यावर लगेच कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल तब्बल 200 रुपयांची घट झाली.

कांद्याचा कमाल भाव 2500 रुपयांवरून 2300 रुपयांवर घसरला. पुढे हा दर आणखी घसरणार हे निश्चित आहे. कारण निर्यात शुल्क वाढविल्याने निर्यातीत घट होईल, देशातील बाजारात कांद्याची उपलब्धता वाढेल आणि दर पडतील त्यामुळे ग्राहकांना कांदा रडविणार नाही हे खरे असले तरी सामान्य कांदा उत्पादकाच्या डोळयांतून ज्या अश्रुधारा वाहत आहेत त्या कोणी पुसायच्या?

ग्राहकांच्या खिशातून पैसे काढा आणि ते बळीराजाच्या खिशात टाका, असे कोणी म्हणणार नाही. शेतकरी आणि ग्राहक यांच्या लाभहानीचा ‘तराजू’ जास्तीत जास्त समतोल कसा राहील ही जबाबदारी आणि कर्तव्य केंद्र सरकारनेच पार पाडायचे असते मात्र मोदी सरकारचे घोडे नेहमी येथेच पेंड खात आले आहे.

पुन्हा शेतमाल दरवाढीचा फायदा शेतकन्यालाच होतो, हा युक्तिवादही अनेकदा फसवा असतो. मागील दीड-दोन महिन्यांत टोमॅटोचे दर प्रतिकिलो 200 रुपयांपर्यंत उसळले होते. त्याचा किती थेट लाभ शेतकन्यांना झाला, हा संशोधनाचा विषय ठरेल.

कांद्याबाबतही यापेक्षा वेगळा पूर्वानुभव नाही. कांद्याचे दर पडतात तेव्हा शेतकन्याला तो फेकून द्यावा लागतो किंवा कवडीमोल दरात विकावा लागतो. दर वाढलेच तर केंद्रातील मायबाप सरकारच दर नियंत्रण धोरणाच्या कुन्हाडीचा घाव घालते.

निर्यातीतून मिळणारे जास्तीचे पैसे शेतकन्याला मिळू देत नाही. कांद्याचे निर्यात शुल्क वाढविण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाने हेच होणार आहे. या निर्णयाचा फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांनाही बसला आहे.

त्यामुळे कांदा उत्पादक जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद पाडण्याचे इशारे शेतकऱ्यांनी दिले आहेत ते चुकीचे कसे म्हणता येतील? शेतकऱ्याच्या खिशात कधीतरी जास्त पैसे पडण्याची वेळ आली की सरकार एकतर निर्यात शुल्क वाढविते, नाही तर निर्यातबंदीचा दांडपट्टा फिरविते.

आताही कांद्याच्या निर्यातीतून मिळू शकणाऱ्या पैशांवर शेतकन्याला पाणी सोडावे लागणार आहे. पुन्हा मोदी सरकारने हा निर्णय अचानक जाहीर केला. त्यात स्पष्टताही नाही. त्यामुळे आधीच निर्यातीसाठी पाठविलेला हजारो टन कांदा सीमेवर आणि बंदरांवर अडकून पडला आहे.

तो कंटेनरमध्येच सडला तर ना निर्यात होईल, ना देशात त्याची विक्री होईल. दोन्ही बाजूंनी नुकसान शेतकऱ्याचेच होईल. वास्तविक, गेल्या वर्षीच्या तुलनेत हिंदुस्थानी कांद्याची निर्यात जुलैपर्यंत तब्बल 63 टक्के वाढली आहे.

ती आणखीही वाढली असती, मात्र सरकारच्या निर्यात शुल्क वृद्धीने या निर्यातीलाच ब्रेक लागला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकाचे वाढीव उत्पन्न तर बुडालेच, परंतु देशांतर्गत भाव कोसळल्यानंतर त्याला दुहेरी फटका सहन करावा लागणार आहे.

या देशातील कांदा उत्पादक नेहमीच अस्मानी-सुलतानीच्या चरकात पिळून निघत असतो. कांद्याने राज्यकर्त्यांनाही रडविले आहे. प्रसंगी सत्तेतूनही घालविले आहे. तरीही कांदा उत्पादकाला रडविण्याचे, बळीराजाला गृहीत धरण्याचेच धाडस विद्यमान सरकार करीत आहे.

देशात भाजीपाला, डाळी कडधान्यांपासून सर्वच प्रकारच्या दरवाढीने उच्चांक गाठला आहे. टोमॅटोने गेल्या महिन्यात 200 रुपयांचा आकडा पार केला होता.

उद्या कांद्यानेही त्याच्याच पावलावर पाऊल टाकले तर आधीच महागाईत होरपळणारी जनता तोंडावर आलेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रातील सत्तापक्षावर ‘मतबंदी’ची कुन्हाड चालवेल, ही मोदी सरकारची खरी धास्ती आणि भीती आहे.

कांद्याचे निर्यात शुल्क तब्बल 40 टक्के वाढविण्याचा निर्णय तडकाफडकी याच भीतीतून घेतला गेला आहे. दरवाढ नियंत्रण आणि जनतेचे हित वगैरे दाखवायचे दात आहेत.

सामान्य कांदा उत्पादकाच्या पोटावर मारलेली निर्यात शुल्क वृद्धीची लाथ हे मोदी सरकारचे ‘खायचे दात आहेत. निर्णयत्रस्त बळीराजा आणि महागाईग्रस्त जनता उद्याच्या निवडणुकीत सत्तापक्षाचे हे दात त्यांच्याच घशात घातल्याशिवाय राहणार नाही.

सौजन्य – सामना 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही