Jayant Patil | आमच्यात आणि अजित पवार गटात वाद सुरू? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Jayant Patil | कोल्हापूर: गेल्या महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. 02 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते.

यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात वाद सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आणि आमच्यात कधीच वाद नव्हते, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

We are activists of Sharad Pawar – Jayant Patil 

तुमच्यात आणि अजित पवार गटात वाद सुरू आहे का? या प्रश्नाचे उत्तर देत जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, “शरद पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या अनेक ठिकाणी सभा होत आहे.

मात्र त्याविषयी काही लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार गट आणि आमच्यामध्ये तुम्हाला कधी वाद होताना दिसले आहे का?

उगाच तुम्ही हा मुद्दा उचलून धरू नका. अजित पवार आणि आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद नाही. आम्ही शरद पवार यांचे कार्यकर्ते आहोत. त्याचबरोबर आम्ही नेहमी त्यांच्या सोबतच राहिलो आहोत.”

पुढे बोलताना ते (Jayant Patil) म्हणाले, “25 ऑगस्ट 2023 रोजी कोल्हापूरमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. कोल्हापूर शहरातील कार्यकर्त्यांनी आग्रह धरला त्यामुळे ही सभा होत आहे.

त्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील 05 सप्टेंबरला शरद पवारांची सभा होणार आहे. शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, 27 ऑगस्ट 2023 रोजी बीड जिल्ह्यात अजित पवार यांची सभा पार पडणार आहे. त्यांच्या या सभेपूर्वी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

अजित पवार यांच्या सभेपूर्वी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा अन्यथा पवारांच्या सभेत घुसून राडा करून सभा उधळून लावू, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यापासून पाऊस पडलेला नाही. धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांच्या समस्यांशी काही घेणं-देणं नाही. उलट शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी त्यांनी बीड जिल्ह्यात अजित पवारांची सभा आयोजित केली आहे, असं सुमंत धस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.