Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.
या मुद्द्यावरून नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन केलं आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन या मुद्द्यावर चर्चा करणार होते.
मात्र, त्या आधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुगली टाकली आहे. जपान दौऱ्यावर असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्याशी संपर्क साधून या मुद्द्यावर तोडगा काढला आहे.
यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
ट्विट करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला.
केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला.
केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 22, 2023
Onion is not a rich man’s food – Sanjay Raut
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “कांदा हे श्रीमंताचं खाणं नाही, तर कांदा हे गरिबांचं खाणं आहे. तरी देखील सामान्य माणसानं कांदा आणि भाकरी खायची नाही का?
एखादी गोष्ट खायला मिळत नाही तर ती खाऊ नका, असं जर सरकार म्हणत असेल तर सरकार म्हणून तुमचा काय उपयोग आहे? कांद्यामुळं दिल्लीतील भाजपचं सरकार गेलं होतं, आता राज्यामध्ये देखील तीच वेळ आलेली दिसत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | गावित साहेब युवकांना प्रेमाचे नाही तर शिक्षणाचे सल्ला द्या – रोहित पवार
- Sanjay Raut | कांदा परवडत नसेल तर खाऊ नका म्हणणारे मंत्री दीडशहाणे; संजय राऊतांची दादा भुसेंवर टीका
- Vijay Wadettiwar | सध्याचं सरकार म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा – विजय वडेट्टीवार
- Jayant Patil | आमच्यात आणि अजित पवार गटात वाद सुरू? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
- Uddhav Thackeray | “मोदी सरकारचे ‘खायचे दात’ अन्…”; ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल