Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: शिंदे गटाचे नेते विजय कुमार गावित (Vijay Kumar Gavit) यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.
मासे खाल्ल्यावर बाईमाणूस चिकना दिसू शकतो. ऐश्वर्या राय दररोज मासे खायची म्हणून तिचे डोळे आणि त्वचा सुंदर आहे, असं गावित यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विजय कुमार गावित यांच्या वक्तव्यावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “मा. गावित साहेब… प्रेमात पडणं ही नाही तर शिक्षण, नोकरी, व्यवसाय ही आजच्या युवा वर्गाची प्राथमिकता आहे.
त्यामुळे सल्ले द्यायचे असतील तर शिक्षण, नोकरी संदर्भात द्या… आणि हो… डोळे कसे दिसतात यापेक्षा त्या डोळ्यातलं पाणी बघणं, चिकण्या स्कीनऐवजी नोकरी मिळत नसल्याने टेन्शनमुळं तारुण्यातच युवांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या बघणं आणि काबाडकष्ट करणाऱ्या त्यांच्या आईवडलांच्या हातावरच्या भेगा पाहणं, हे तुमचं काम आहे! कारण तुम्ही मंत्री आहात!”
मा. गावित साहेब… प्रेमात पडणं ही नाही तर शिक्षण, नोकरी, व्यवसाय ही आजच्या युवा वर्गाची प्राथमिकता आहे. त्यामुळे सल्ले द्यायचे असतील तर शिक्षण, नोकरी संदर्भात द्या…
आणि हो…
डोळे कसे दिसतात यापेक्षा त्या डोळ्यातलं पाणी बघणं, चिकण्या स्कीनऐवजी नोकरी मिळत नसल्याने टेन्शनमुळं…— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 22, 2023
Eating fish improves skin and eye beauty – Vijay Kumar Gavit
दरम्यान, धुळ्यात जिल्ह्यात आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचं साहित्य वाटप करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना विजय कुमार गावित यांनी ऐश्वर्या रायबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.
ते म्हणाले, “मासे खाल्ल्याने आपल्याला दोन फायदे मिळतात. मासे खाल्ल्याने त्वचा आणि डोळ्याचे सौंदर्य वाढते. त्याचबरोबर नियमित माशांचे सेवन केल्याने बाईमाणूस चिकना दिसू शकतो.
ऐश्वर्या राय दररोज मासे खायची म्हणून तिचे डोळे एवढे सुंदर आहे. तुम्ही दररोज मासे खाल्ले तर तुम्ही तिच्यासारखे सुंदर दिसू शकतात.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | कांदा परवडत नसेल तर खाऊ नका म्हणणारे मंत्री दीडशहाणे; संजय राऊतांची दादा भुसेंवर टीका
- Vijay Wadettiwar | सध्याचं सरकार म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा – विजय वडेट्टीवार
- Jayant Patil | आमच्यात आणि अजित पवार गटात वाद सुरू? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
- Uddhav Thackeray | “मोदी सरकारचे ‘खायचे दात’ अन्…”; ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- Amol Mitkari | गावित आदिवासींचे प्रश्न सोडून ऐश्वर्या रायचे डोळे बघतात – अमोल मिटकरी