Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकार विरोधात आंदोलन केलं आहे.
अशात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने दिलासा देणारा एक निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
The central government is going to buy 2 lakh metric tonnes of onion – Eknath Shinde
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. नाशिक आणि इतर ठिकाणच्या केंद्रावरील कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी केला जाणार आहे.
केंद्र सरकार 2410 रुपये प्रति क्विंटल भावाने कांदा खरेदी करणार आहे. महाराष्ट्राला आणखीन गरज भासल्यास केंद्र सरकारकडून सहकार्य मिळेल. त्याचबरोबर महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला अडचण येऊ नये, म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.”
दरम्यान, या मुद्द्यावरून आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, “कांद्याबाबत केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे तो फक्त सत्तेसाठी आणि ग्राहकांचं हित जपण्यासाठी घेतला आहे.
कांद्याचा दर घसरल्यानंतर सरकार कधीच हस्तक्षेप करत नाही. परंतु कांद्याचा दर वाढल्यावर सरकार हस्तक्षेप करताना दिसत आहे.
सरकारने कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार करायला हवा. मात्र, सरकार फक्त कांदा खाणाऱ्यांचा विचार करताना दिसत आहे. केंद्र सरकार नामर्द आहे. अटल बिहारी बाजपेयी यांचं सरकार कांद्याच्या प्रश्नामुळं कोसळलं होतं. म्हणून तुम्ही एवढे घाबरत आहात का?”
महत्वाच्या बातम्या
- Bacchu Kadu | केंद्रातील सरकार नामर्द; कांद्याच्या प्रश्नावरून बच्चू कडुंची केंद्र सरकारवर घणाघाती टीका
- Sharad Pawar | कांद्याच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारचा निर्णय शेतकऱ्यांची अपेक्षा…”
- Ambadas Danve | “उद्या जेवण मिळालं नाही म्हणून…”; अंबादास दानवेंचा दादा भुसेंवर खोचक टोला
- Ramdas Athawale | महाराष्ट्रात पिकतो कांदा महाविकास आघाडीचा झालाय वांदा – रामदास आठवले
- Navneet Rana | खासदार नवनीत राणा यांना जीवे-मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण