Bacchu Kadu | पिंपरी चिंचवड: कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. कारण केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर 40 टक्के कर लावला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. अशात या मुद्द्यावरून आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे.
केंद्र सरकारनं हा निर्णय सत्तेसाठी आणि ग्राहकांचं हित जपण्यासाठी घेतला असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
The central government is impotent – Bacchu Kadu
बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “केंद्रातील सरकार नामर्द आहे. कारण कांद्याबाबत केंद्र सरकारनं जो निर्णय घेतला आहे, तो फक्त सत्तेसाठी आणि ग्राहकांचं हित जपण्यासाठी घेतला आहे.
कांद्याचे दर घसरल्यानंतर सरकार कधीच हस्तक्षेप करत नाही. मात्र कांद्याचा दर वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करताना दिसत आहे. सरकार फक्त कांदा खाणाऱ्या लोकांचा विचार करत आहे.
मात्र, सरकारनं कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा देखील विचार करायला हवा. कांद्याच्या प्रश्नावरूनच अटल बिहारी बाजपेयी यांचं सरकार कोसळलं होतं. म्हणून तुम्ही एवढे घाबरत आहात का?”
दरम्यान, केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर 40% शुल्क लागू केल्यानंतर आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
सरकारच्या या निर्णयावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्र सरकार प्रति क्विंटल 2410 रुपयांनी कांदा खरेदी करणार आहे. परंतु शेतकऱ्यांना हा भाव न परवडणारा आहे.
केंद्र सरकारनं 4000 रुपये प्रति क्विंटल रुपयांनी कांदा खरेदी करायला हवा. सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण न करणारा आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | कांद्याच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारचा निर्णय शेतकऱ्यांची अपेक्षा…”
- Ambadas Danve | “उद्या जेवण मिळालं नाही म्हणून…”; अंबादास दानवेंचा दादा भुसेंवर खोचक टोला
- Ramdas Athawale | महाराष्ट्रात पिकतो कांदा महाविकास आघाडीचा झालाय वांदा – रामदास आठवले
- Navneet Rana | खासदार नवनीत राणा यांना जीवे-मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Rohit Pawar | देवेंद्र फडणवीसांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समस्या समजलेली नाही – रोहित पवार