Sharad Pawar | कांद्याच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारचा निर्णय शेतकऱ्यांची अपेक्षा…”

Sharad Pawar | मुंबई: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लागू केल्यामुळे राज्यातील शेतकरी जागोजागी आंदोलन करताना दिसत आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर नाशिक जिल्ह्यात जवळपास 16 बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. यानंतर केंद्र सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे.

2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Government should buy onion at Rs 4000 per quintal – Sharad Pawar

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “केंद्र सरकार प्रति क्विंटल 2410 रुपयांनी कांदा खरेदी करणार आहे. मात्र, केंद्र शासनाचा हा भाव खूपच कमी आहे.

सरकारने 4000 प्रति क्विंटल रुपयांनी कांदा खरेदी करायला हवा. कारण 2410 रुपयांमध्ये शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा उत्पादन खर्च भरून निघणार नाही.

सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निर्यात शुल्क कमी करायला हवा. कांदा अधिक काळ टिकून राहतो. त्यामुळे शेतकरी योग्य तो निर्णय होईपर्यंत थांबू शकतात.”

दरम्यान, या मुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. परवडत नसेल तर दोन-तीन महिने कांदा खाऊ नका, असं दादा भुसे यांनी म्हटलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मूळ प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून दादा भुसे काहीही बडबड करतात. सध्याचं सरकार असंवेदनशील आहे.

उद्या दादा भुसे जेवलो नाही म्हणून मेलो म्हटलं तरी काय फरक पडतो, असं म्हणतील. ते म्हणतात कांदा खायचा नाही. जर कांदा खायचा नसेल तर मग शेतकऱ्यांनी कांदा पिकवून काय उपयोग?”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.