Share

Ambadas Danve | “उद्या जेवण मिळालं नाही म्हणून…”; अंबादास दानवेंचा दादा भुसेंवर खोचक टोला

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. कारण केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. अशात मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मोठं विधान केलं होतं. दोन-तीन महिने कांदा खाणं परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, असं … Read more

Published On: 

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. कारण केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. अशात मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मोठं विधान केलं होतं.

दोन-तीन महिने कांदा खाणं परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, असं दादा भुसे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

The present government is insensitive – Ambadas Danve

दादा भुसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, “सध्याचं सरकार असंवेदनशील आहे. जेवलो नाही म्हणून मेलो म्हटलं तरी काय फरक पडतो, असं उद्या दादा भुसे म्हणतील.

मग दादा भुसे मंत्री नसतील तर काय पडेल? मूळ प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून ते काहीही बडबड करतात. जर कांदा नाही खायचा तर मग शेतकऱ्यांनी कांदा पिकवून उपयोग काय?”

पुढे बोलताना ते म्हणाले, “केंद्र सरकारने कांद्यावर लावलेला 40 टक्के निर्यात शुल्क बंद केला पाहिजे. एकीकडे सरकार कापसावरील आयात शुल्क कमी करत आहे आणि दुसरीकडे कांद्याचा निर्यात शुल्क वाढवत आहे.

ही कोणती पद्धत आहे. सरकारचं हे आयात निर्यात धोरण नेमकं कुणाच्या फायद्याचा आहे. सरकारचं हे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे हा 40% शुल्क रद्द झाला पाहिजे. यासाठी राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी आंदोलन केली जात आहे.”

दरम्यान, या मुद्द्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, “कांदा हा श्रीमंतांचा नाही तर गरिबांचं खाणं आहे.

मात्र, सामान्य माणसांनी कांदा भाकरी खायची नाही का? शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा हे आमचं म्हणणं आहे. एखादी गोष्ट खायला मिळत नसेल तर ती खाऊ नका असं जर सरकार म्हणत असेल, तर सरकार म्हणून तुमचा काय उपयोग आहे? परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, असं म्हणणारे मंत्री दीडशहाणे आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही