Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) दोघांनीही पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार राज्यात विविध ठिकाणी सभा घेताना दिसत आहे. येत्या 25 तारखेला कोल्हापूर शहरामध्ये शरद पवारांची जाहीर सभा पार पडणार आहे.
त्यांच्या या या सभेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला जे वाटतं आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
We always try to do what we think is right – Ajit Pawar
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कार्यकर्ते म्हणून सरकारमध्ये काम करत आहोत. आम्हाला जे योग्य वाटतं ते करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो.
शरद पवारांनी सभा कुठे आणि कधी घ्यावी? हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. आम्ही आमचा टेंभा मिरवतोय, असं कृपा करून कुणीही समजून घेऊ नका.
याबद्दल तुम्ही कुणालाही खाजगीत प्रश्न विचारू शकतात. विचारधारा वेगवेगळी असू शकते. मात्र, सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असते.”
शरद पवार यांच्या परवानगीशिवाय तुम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला का? या प्रश्नाचं उत्तर देत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “आम्ही सर्वांनी बहुमताने मिळून हा निर्णय घेतला आहे.
कारण लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्वतःची विचारधारा बाजूला ठेवून 2019 मध्ये शिवसेनेसोबत आघाडी केली.
त्यामुळे आम्ही शरद पवारांपेक्षा काही वेगळी भूमिका घेत आहोत असं दाखवण्याचं काहीच कारण नाही. कारण भाजप आणि शिवसेना अनेक वर्षांपासून मित्रपक्ष होते.
शिवसेनेसोबत युती करून आम्ही अडीच वर्ष राज्य सरकार चालवलं. मग येणाऱ्या काळात युतीतील दुसरा मित्र पक्ष देखील चालून घेतला पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | कांद्याच्या मुद्द्यावरून दादा गट आणि भाजप आमने-सामने; अजित पवार म्हणाले, “आम्हाला श्रेय…”
- Eknath Shinde | कांद्याच्या मुद्द्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “महाराष्ट्रातील गरीब जनतेला…”
- Bacchu Kadu | केंद्रातील सरकार नामर्द; कांद्याच्या प्रश्नावरून बच्चू कडुंची केंद्र सरकारवर घणाघाती टीका
- Sharad Pawar | कांद्याच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारचा निर्णय शेतकऱ्यांची अपेक्षा…”
- Ambadas Danve | “उद्या जेवण मिळालं नाही म्हणून…”; अंबादास दानवेंचा दादा भुसेंवर खोचक टोला